एप्रिल महिन्यात सारख्या सुरु असलेल्या पावसाळा सदृश्य अवकाळी पाऊस-चक्रीवादळे व गारपिटीमुळे फळबागा पालेभाज्या व उन्हाळी पिकांचे अतोनात नुकसान झालेले असून, अन्नदाता बळीराजा सगळी कडूनच भरडला जाता असल्याची १००% सत्य अशी कटू स्थिती असून एकीकडे सुल्तानी संकटे तर दुसरीकडे अस्मानी आपदा त्यामुळे शेतकरी राजा काय करावे ? अशा द्विधा मनःस्थितीत सापडलेला आहे.गेल्या आठवडया भरात दोन तिनदा लागोपाठ झालेल्या चक्रीवादळे, लिबांसारखी भयंकर गारपिट व मुसळधार पावसाने त्याच्या उन्हाळी पिकांचे भयंकर नुकसान झाल्याचे अंदाज असून,फळबागा व पालेभाज्या उध्वस्त झालेल्या आहेत.शिवाय शेतामधून पावसाचे पाट वाहील्याने अनेक ठिकाणी तर जमीनी खरडून गेल्याचे वृत्त मिळत आहेत. अनेकांच्या शेतातील मोटारी जळाल्या असून,ग्रामीण भागातील त्यांच्या झोपडीवजा घरादारांचे गुराढोराचे सुद्धा नुकसान झालेले आहे.शेतकरी राजा येणाऱ्या हंगामाच्या काळजी पोटी भयग्रस्त दिसून येत आहे. त्यामुळे शासनाने व शासनाच्या पदाधिकारी अधिकारी लोकप्रतिनिधीनी त्वरीत ग्रामीण भागातील शेतजमिनीच्या बांधावर जाऊन,नुकसानग्रस्त शेतजमीनी व घरादारांचे तात्काळ पंचनामे करून, शासनाने नुकसानग्रस्तांना तात्काळ अत्यावश्यक मदत करण्याची मागणी होत असल्याचे वृत्त महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेला मिळाल्याचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी कळवीले आहे.