वाशिम : शासकीय जादुटोणा विरोधी कायदा प्रचार व प्रसार अंमलबजावणी समितीची बैठक नुकतीच निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली.या वेळी
डॉ रामकृष्ण कालापाड यांनी बैठका नियमित व्हाव्यात व ठरलेल्या मुद्द्याप्रमाणे कारवाई झाली पाहिजे या संदर्भात ठराव मांडला.कुसुमताई सोनुने म्हणाल्या की समितीची बैठक ही दर तीन महिन्यातून एकदा व्हावी व वाशिम जिल्ह्यात वाढलेल्या अंधश्रद्धेच्या संदर्भात योग्य ती ठोस भूमिका घ्यावी.पी. एस. खंदारे यांनी उपस्थित सर्व सन्माननीय पीआयएमसी समितीचे अध्यक्ष तथा अप्पर जिल्हाधिकारी व सदस्य सचिव तथा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्या समोर महत्वपूर्ण विषयावर चर्चा केली . ती पुढील प्रमाणे, "जिल्ह्यात म्हसनी तालुका मानोरा या गावातील एका महिलेला व तिच्या कुटुंबीयांना करणीच्या संशयावरून संपूर्ण गावाने भेटीस धरले आहे व अघोषित असा सामाजिक बहिष्कार देखील टाकल्या आहे.सदरील कुटुंबासोबत गावातील कोणतीही व्यक्ती कोणत्याही प्रकारचा व्यवहार करत नाही.या कुटुंबातील व्यक्ती दिसताक्षणी घरात जातात किंवा दरवाजा बंद करून घेतात.या परिस्थितीत त्यांच्या जीवितास धोका असल्याने पोलिसांनी कारवाई करावी . म्हणून मानोरा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे .परंतु पोलिसांनी केवळ अदखलपात्र दाखल करून वेळ मारुन नेली आहे. तरी संबधीत घटनाचे गांभिर्य ओळखून वेळीच पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याचे रूपांतर एफ.आय.आर. नोदवून दखलपात्र गुन्ह्यामध्ये करावे.व त्यामध्ये जादूटोणाविरोधी कायदा कलम सहा अन्वये गुन्हा दाखल करावा.तसेच सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याची कलम आणि प्रचलित भादवी कलमांचा समावेश करून गावामध्ये पोलीस पाटील सरपंच तंटामुक्तीचे अध्यक्ष व प्रमुख गावकऱ्यांसमवेत चर्चा करून दर आठ दहा दिवसांनी अचानकपणे पोलिसांनी भेटी द्याव्यात.व त्या कुटुंबाचे संरक्षण होईल आणि अनर्थ टळेल अशा पद्धतीची भूमिका पोलिसांनी घ्यावी.तसेच त्या कुटुंबांना सशस्त्र पोलीस संरक्षण देऊन गावात जादूटोणाविरुद्ध कायद्याची प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करावे. यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य पदाधिकारी व मानसोपचार तज्ञ यांच्या मदतीने मन मनाचे आजार भुताचे झपाटणे, करणी, भानामती हा प्रकार काय आहे ? या विषयावर गावकऱ्यांच्या गैरसमजा संबंधात जाहीर कार्यक्रमाचे आयोजन करावे . तसेच वाशिम जिल्ह्यातील माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षकांचे प्रशिक्षण देखील घेण्यात यावे .सोबतच पोलीस पाटील व तंटामुक्ती अध्यक्ष ग्रामसेवक आणि सरपंच उपसरपंच यांचे प्रत्येक तालुका स्तरावर एक एक जादूटोणाविरुद्ध कायद्याचे प्रशिक्षण शिबिर घेण्यात यावे." जिल्ह्यामध्ये वाढती अंधश्रद्धा व त्यातून होणारे अनुचित प्रकार थांबण्याच्या आवाहन पी.एस. खंदारे यांनी केले . महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने प्रकाशित होत असलेले अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेचे विमोचन माननीय विश्वनाथ घुगे अपर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जादूटोणाविरोधी कायदा प्रचार प्रसार अमलबजावणी समिती यांच्या हस्ते व मारोती वाठ सहाय्यक आयुक्त समाज कल्याण तथा सदस्य सचिव आणि महा आणि सचिव पदाधिकारी व जादूटोणाविरोधी कायदा प्रचार प्रसार अमलबजावणी समितीचे पी. एस. खंदारे, कुसुम सोनुने,डा.रामकृष्ण कालापाड, कार्याध्यक्ष विजय शिंदे, पोलिस निरीक्षक बांगर, शिक्षण विस्तार अधिकारी,प्रा.उन्मेश घूगे आदी सदस्यांच्या उपस्थितीत प्रकाशन सोहळा संपन्न झाला