अकोला : वाशिम बायपास जुने स्थित खेडकर विद्यालयांमध्ये तुळशी पूजनाचा कार्यक्रम करण्यात आला.खेडकर विद्यालयाच्या भव्य प्रांगणात विद्यार्थ्यांनी तुळशीचे पूजन करून तुळशी आरती सादर करून तुळशीचे महत्त्व दाखविले. दरम्यान यावेळी ओरीसा येथील हभप ओंकारानंदजी महाराज यांनी तुलसी आरती गाऊन असंख्य विद्यार्थ्यांना शालेय जीवन व अभ्यासक्रमाबरोबर तुळशीचे आपल्या जीवनातील महत्त्व सांगितले. विशेष म्हणजे सर्वधर्मीयाना एकत्र करून आसाराम बापू यांच्या आश्रमा मार्फत सर्वांचे मंगल होण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबविले जात असतात.यामधे 25 डिसेंबर हा तुळशीपूजन दिन म्हणून साजरा केला जातो.भारतात तुळशीच्या रोपाला अत्यंत पूजनीय आणि पवित्र मानले जाते.शास्त्रामध्ये तुळशीच्या रोपाला लक्ष्मीचे रूप मानले गेले आहे.ज्या घरांमध्ये तुळशीचे रोप लावले जाते आणि तिची नित्य पूजा केली जाते तेथे नेहमी सुख- समृद्धी राहते. वास्तुशास्त्रातही तुळशीच्या झाडांना विशेष महत्त्व आहे. तुळशीच्या रोपामध्ये नकारात्मक ऊर्जा दूर करण्याची क्षमता असते. त्यामुळे प्रत्येकाने तुळशीचे रोज पूजन करावे. तसेच वृक्षारोपण व संगोपनावर भर द्यावा.असे विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांना महत्त्व पटवून सांगितले.
दरम्यान शालेय जीवनामध्येच विद्यार्थ्यांना तुळशीचे महत्त्व पटावे.यासाठी रंगभरण स्पर्धेचे आयोजन करून सहभागी विद्यार्थ्यांना आयोजकामार्फत शालेय शालेय साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी विष्णुपंत खेडकर विद्यालय मुख्याध्यापक निलेश खेंडकर, शिक्षक प्रज्ञानंद थोरात, गोपाल वानखडे, सुरेश सुरत्ने, कांचन वानखडे, उषा जगदाळे, आशा हिवरकर, शितल तिवारी, कांचन तायडे व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.असे वृत्त आमचे प्रतिनिधी प्रज्ञानंद थोरात यांनी कळवीले आहे.