अकोला: स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे संस्थापक अध्यक्ष डॉ.विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात दिव्यांग रोजगारासाठी संस्था संपूर्ण भारतभर सामाजिक उपक्रम राबवित आहे . यावर्षी संस्थेद्वारा दिव्यांग बांधवांना प्रशिक्षण देऊन श्री गणेश पूजा किट ची निर्मिती करण्यात आली . सदर पूजा किट मध्ये बाप्पाच्या पूजेसाठी लागणाऱ्या ११ पूजा साहित्याचा समावेश करण्यात आला आहे . ज्या मध्ये अगरबत्ती ,धूप, कापूर ,गुलाल ,कुंकू अक्षदा ,सुपारी ,आसन ,गणपतीचे वस्त्र, वाती, फुलवाती ,तुपाच्या विविध आकाराच्या फुलवाती, टिळाचंदन ,अत्तर अशा पूजा साहित्याची निर्मिती गणेश उत्सव, गौरी, नवरात्र व दिवाळीच्या निमित्ताने संस्थेतर्फे करण्यात आली आहे. या सर्व सामाजिक उपक्रमात १०० दिव्यांगांना संस्थेतर्फे रोजगार दिला जात आहे . अकोला जिल्ह्यात विविध ठिकाणी पूजा साहित्याचे स्टॉल लावून सामान्य जनतेपर्यंत हे सर्व साहित्य कमीत कमी देणगी शुल्कात उपलब्ध केल्या जात आहे . *गणेश चतुर्थीच्या दिवशी दि.७ सप्टेंबर २०२४ रोजी जानोरकर भवन येथे दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला , आस्था योग फाउंडेशन व महाराष्ट्र योग शिक्षक संघ च्या संयुक्त विद्यमाने पूजा साहित्याचे प्रदर्शन व विक्री स्टॉल लावण्यात आला*. योगसाधकांनी एक हात सहकार्याचा देऊन या पूजा साहित्याची खरेदी केली दिव्यांगांच्या शिक्षण, रोजगार व आरोग्यासाठी समर्पित या सामाजिक उपक्रमात
अकोलेकरांनी सहभाग नोंदवावा असे आव्हान योग गुरु चंद्रकांत अवचार यांनी केले तर ज्या दिव्यांगांना रोजगार व प्रशिक्षण हवे आहे तसेच पूजा साहित्य घरपोच मिळवण्यासाठी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोलाच्या ९४२३६५००९० या हेल्पलाइनवर संपर्क साधावा अशी माहिती आमच्या प्रतिनिधीशी बोलताना संस्थापक अध्यक्ष डॉ.विशाल कोरडे व सदस्य अस्मिता मिश्रा यांनी दिली . या सामाजिक उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सुभाष तायडे ,ओंकारजी शेरेकर ,श्रीधरजी मेतकर, जनार्धन नवथळे ,राजू नकासकर श्रावण फाले, किशोरजी गावंडे,नागे, माया तिजारे,संगीता इंगोले,ज्योती गायकवाड ,तेजराव टाले,संगीता मोकळकर,सुनीता सराले, मोहन बेदरकर, प्रवीण खाम्बलकर, भिसे, राजेंद्र सराले व दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोलाचे सदस्य अनामिका देशपांडे,सारिका उगले, नेहा पलन, राजू डांगे व दुर्गा दुगाने यांनी सहकार्य केले .
आपल्या प्रतिक्रिया द्या....