कारंजा [लाड] : आसाम प्रांतातिल गोहाटी येथील श्री कामाख्यादेवीचे, संपूर्ण भारतातिल एकमेव शक्तिस्थळ असलेल्या श्री कामाक्षा देवी मंदिरात, जय भवानी जय मल्हार गोंधळी नवरात्रोत्सव मंडळ आणि साप्ताहिक करंजमहात्म्य परिवाराच्या वतीने घटस्थापना आणि करंजमहात्म्यच्या तृतिय वर्धापन दिनाचा दुग्धशर्करा योग साधीत नवरात्रोत्सवा निमित्त, श्री कामाक्षा देवीच्या आकर्षक अशा कॅलेडर आणि विशेषांकाचे प्रकाशन शिक्षक आमदार एड किरणराव सरनाईक यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात त्यांचे हस्ते करण्यात आले .

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितांमध्ये माजी नगराध्यक्ष अरविंदजी लाठीया, माजी जि प समाज कल्याण सभापती जयकिसन राठोड, भाजपाचे शहर अध्यक्ष ललितजी चांडक, आदर्श शिक्षीका राधाताई मुरकुटे, गुरुदेव सेवा मंडळाचे व्यसनमुक्ती सम्राट हभप लोमेश पाटील चौधरी, कृष्णराव देशमुख गुरुजी वाशिम, वैदर्भिय नाथ समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ पवार, अभा नाट्य परिषद मुंबई सदस्य नंदकिशोर कव्हळकर, माजी सरपंच प्रदिप वानखडे, प्रा .भाऊराव जाधव, डॉ मुजफ्फर खान, श्री कामाक्षा देवी मंदिराचे अध्यक्ष दिगंबरपंत महाजन, श्री कामाक्षा देवीचे गोंधळी आणि सामाजिक कार्यकर्ते संजय कडोळे हे होते . यावेळी मान्यवरांचे हस्ते श्री कामाक्षा देवीचे पूजन करून, कॅलेंडर व विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले .

श्री कामाक्षा देवी संस्थान तर्फे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन आ . सरनाईक यांचेसह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला .कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय कडोळे यांनी केले . नंतर जयकिसन राठोड तथा माजी नगराध्यक्ष अरविंद लाठीया यांनी करंजमहात्म्य परिवाराच्या कार्याची प्रशंसा केली . त्यानंतर आपल्या संभाषणातून बोलतांना आ. सरनाईक म्हणाले, "मी अमरावती विभागाचा जबाबदार आमदार असल्याने माझ्या कामाचा व्याप भरपूर आहे. परंतु ३५ ते ४० वर्षापूर्वी कारंजेकराशी माझी नाळ जुळली आहे.

त्यामुळे कारंजेकरांच्या आमंत्रणाला आणी त्यातही संजय कडोळे यांच्या आमंत्रणाला मी नकार देऊच शकत नाही. एकेकाळी आई श्री कामाक्षा मातेच्या दर्शनाला प्रत्यक्ष हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवराय आले होते. ही आई कामाक्षा माता नवसाला पावणारी जागृत देवता असून, आई कामाक्षा मातेच्या कृपाशिर्वादानेच मी विधान परिषदेचा आमदार झालो आहे . त्यामुळे हे माझे श्रद्धास्थान आहे. आज घटस्थापनेच्या पहिल्या माळेला दर्शनाची संधी लाभली हे माझे अहोभाग्य असल्याचे त्यांनी सांगीतले " सदरहु कार्यक्रमाला पांडूरंग माने, मोहित जोहरापूरकर , हिमंत मोहकर, रविन्द्र नंदाने, किशोर धाकतोड,एड संदेश जिंतुरकर, राजीक शेख, इम्तियाज लुलानिया, प्रा शेकुवाले विजय खंडार, देविदास नांदेकर, रोहीत महाजन, राजेश चंदन, सुनिल गुंठेवार, सुभाष गाडगे, डॉ ज्ञानेश्वर गरड, शेषराव पाटील इंगोले, रोमिल , सौ छाया गावंडे, सौ इंदिरा मात्रे, कांताबाई लोखंडे आदीची उपस्थिती होती .
आपल्या प्रतिक्रिया द्या....