अंगणवाडी सेविकेच्या घरी जावून तिला आणि तिच्या मुलीला ठार मारण्याची धमकी देणाऱ्या 14 जणांविरोधात गंगाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ही घटना काल कोहका येथे घडली. कोहका येथील देवाबाई युवराज मोरे (46) या अंगणवाडी सेविकेच्या घरी जाऊन त्यांना व त्यांच्या मुलीला आरोपी सीताराम लांजेवार रेखा लांजेवार संजय लांजेवार (सर्व रा. नागपूर), कैलास माहुरे, ममता माहुरे, शुभम माहुरे (रा. कुडवा), शारदा माहुरे (रा. अत्री), मंजुषा नारायण बोंदरे, शिवशंकर बोंदरे, अरुणा बोंदरे (रा. दहेगाव जोशी, नागपूर), दशरथ जुरकार, रेखा जुरका यांच्यासह 14 जणांनी ठार मारण्याची धमकी दिली. काल सायंकाळी 4 वाजतादरम्यान घडलेल्या या घटनेसंदर्भात गंगाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अंगणवाडी सेविकेच्या मुलीला मारण्याची धमकी दिल्यामुळे वातावरण खूप तापले आहे, तसेच दहशतही पसरली आहे.