वाशिम यवतमाळ लोकसभा मतदार संघांचे , लोकसभेत यशस्वी प्रतिनिधित्व करण्याकरीता आणि मागासलेल्या ह्या लोकसभा मतदार संघाच्या विकासाकरीता खऱ्या अर्थाने कटीबद्ध राहून येथील सर्वसामान्य मतदार राजाच्या सर्वांगीन विकासाकरीता सर्वाच्या आवडीचे,लाडके उमेद्वार म्हणून माजी मंत्री संजय देशमुख यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची महाविकास आघाडीची उमेद्वारी देण्यात आल्यामुळे वाशिम यवतमाळ लोकसभा मतदार संघात नवचैतन्य निर्माण होऊन सर्वत्र मतदारामध्ये उत्साह व आनंदाचे वातावरण दिसत असून, आमचे जिल्हा प्रतिनिधी तथा महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांना मिळालेल्या माहिती नुसार, मंगळवार दि. 02 एप्रिल 2024 रोजी, पोस्टल ग्राऊंड यवतमाळ येथून ,महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेद्वार संजय देशमुख हे आपला उमेद्वारी अर्ज दाखल करण्यास निघणार असून यावेळी संपूर्ण वाशिम व यवतमाळ जिल्ह्यातील व मतदार संघातील त्यांच्या चाहत्यांचा गोतावळा उपस्थित असणार असल्याचे वृत्त त्यांचे चाहत्यांकडून मिळाले आहे.