कारंजा (लाड) :-विदर्भात प्रख्यात असलेली वाशिम जिल्ह्यातील कारंजा (लाड) येथील ऐतिहासिक असलेली शाळा जे.डी.चवरे विद्यामंदिर या विद्या मंदिरात अनेक विद्यार्थी घडून देशात अनेक ठिकाणी कोणी न्यायाधीश वकील डॉक्टर आय.ए.एस. कलेक्टर झाले असून अनेक ठिकाणी उच्च पदावर कार्यरत आहे.अशातच अतिशय हलाखीच्या गरीबीच्या परिस्थितीमध्ये शिक्षण घेतलेले राम शेजव यांनी प्रतिकूल परिस्थिती मधून इंग्रजी विषयावर प्रभुत्व मिळवून गरिबीच्या काळात त्यांनी एम.ए.इंग्लिश पूर्ण केले. आज रोजी त्यांच्या शिक्षण शैलीनुसार अनेक विद्यार्थी अनेक पदावर देशात कार्यरत असून प्रशासकीय नोकरीत आहेत.राम शेजव सर व मंजली रायबागकर यांनी सतत 25 वर्ष सेवा दिल्यानंतर त्यांचा जे.डी.चवरे विद्या मंदिर येथे दि.4 एप्रिल 2025 रोजी शुक्रवारला सेवा निवृत्त निरोप समारंभ
कार्यक्रमाचे आयोजन करण्यातआले होते.यावेळी शाळेतील शिक्षक व कर्मचारी वृदांनी राम शेजव सर तसेच शिक्षिका मंजली रायबाकर यांच्या विषयी भावनात्मक होऊन त्यांच्या शिक्षण शैलीतील व जीवनातील अनेक अनुभव कथन करून प्रत्येकाचे मन भारावून गेले होते.सर्वांच्या भावना उत्कंठाला आल्या होत्या. राम शेजव यांच्या अर्धांगिनी सौ.विद्या शेजव यांनी सुद्धा थोडक्यातच त्यांच्या जीवनातील ऐतिहासिक क्षण सांगितले त्यावेळेस राम शेजव इतर शिक्षक वृंद यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू अनावर झालेत.त्यावेळेस या निरोप समारंभाला रायबोले मॅडम यांचाही उत्कंठ दाटून आला.राम शेजव सरांनी आपल्या जीवनामध्ये काय घडले आणि आपण नेमके समाजासाठी काय करायला पाहिजे.समाजाला काय द्यायला पाहिजे.त्यांचे उदाहरण सर्व शिक्षक वृंद तसेच आलेल्या पाहुणे मंडळीच्या मनाला भिडून गेले.अशातच काही पाहुणे मंडळींनी राम शेजव विषयी आपले अनुभव कथन केले.राम शेजव सरांनी गेल्या पंचवीस वर्षापासून इंग्रजी विषयाला अनुसरून शाळेमध्ये सेवा दिली. त्यांनी मराठी विषया मध्ये अनेक कवीता लेख लिखाण केले आहे.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जे.डी.चवरे विद्या मंदिर शाळेच्या अध्यक्षा डॉ.लीना चवरे (व्यवस्थापक) विनम्र चवरे(व्यवस्थापकीय)सदस्य या कार्यक्रमाच्य अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्रीनिवास जोशी यांनी भूषविले होते.
या निरोप समारंभ कार्यक्रमाला मा.जिल्हा परिषद सदस्य गजानन अमदाबादकर, पत्रकार विजय खंडार संपादक विनोद गणवीर ,ऍड.मिलिंद खंडारे , सलीम भाई, सामाजिक सेवक रंगराव शेजव ,अंबादासजी काकड सरपंच ,कुपटी येथील गणेश निघोंट अमरावती येथील लेखाधिकारी चंद्रशेखर खंडारे,मुंबई मंत्रालयातील सचिव शिक्षक सुनील बसवत, प्राध्यापक संजय खडसे यांनी भेटवस्तू देऊन गौरव करून राम शेजव यांच्या बद्दल आपले मनोगत व्यक्त केले.शेजव सरांची पत्नी विद्या शेजव यांनी सुद्धा शेजव सरांच्या जीवनातील अनुभव कथन केले.कार्यक्रमा सुत्र संचालन निलेश मानकर यांनी केले.तर प्रतीक्षा वऱ्हाडे यांनी आभार मानले.या निरोप समारंभ कार्यक्रमाला
शेजव सरांना मानणारे मित्र परिवार नातेवाईक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील वरिष्ठ लिपिक सुहास भाऊ भोंगाडे,विवेक गहानकरी व शाळेतील सर्व शिक्षक शिक्षीका कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.सेवानिवृत्ती बद्दल त्यांना साप्ताहिक करंजमहात्म्यचे संपादक तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष संजय कडोळे यांनी भविष्यातील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या असल्याचे वृत्त आमचे प्रतिनिधी विजय खंडार यांनी कळवीले आहे.