कारंजा : कारंजा नगरीतील अत्यंत प्रेमळ,प्रामाणिक व मनमिळाऊ स्वभावाचे हास्यमुख व्यक्तिमत्व,कारंजा शहर भाजपाचे अध्यक्ष ललितजी चांडक हे त्यांच्या उत्कृष्ट अशा हजरजवाबी ,कार्यतत्पर अशा संघटन कार्यशैलीमुळे संपूर्ण कारंजा शहरातील नागरिकांमध्ये ओळखले जातात. प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या कार्याने भारावून त्यांनी पक्षाने दिलेली जबाबदारी समर्थपणे सांभाळून, कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघामध्ये विद्यमान भाजपा आमदार राजेंद्र पाटणी यांच्या मार्गदर्शनात भाजपा संघटन वाढविण्याचा नुसता प्रयत्नच नाही तर भाजपा पदाधिकार्याना सोबत घेवून संघटन वाढविले आहे. गेल्या विधानसभा निवडणूकीत तर अगदी घरावर तुळशीपत्र ठेवून त्यांनी इतर कार्यकर्त्यासोबत, स्वतःला निवडणूक प्रचारामध्ये झोकून दिले होते.आ.राजेंद्रजी पाटणी देतील त्या जबाबदाऱ्या सांभाळून भाजपा पक्षाचे विविध कार्यक्रम ते पार पाडीत असतात.त्यामुळेच त्यांच्याकडून कारंजेकरांच्या अपेक्षा वाढलेल्या दिसत असून कारंजा नगरीचे उज्वल भवितव्य म्हणून कारंजेकर ललितजी चांडक यांचकडे पहात असल्याचे कारंजेकरांच्या चर्चेतून दिसून येत आहे.असे वृत्त ज्येष्ठ पत्रकार संजय कडाळे यांनी कळवीले आहे.