वंदनिय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या 54 व्या पुण्यतिथी महोत्सव अर्थात सर्वसंत स्मृति मानवता दिना निमित्त 24 डिसेंबर ते 25 डिसेंबर रोजी गुरुदेव सेवा मंडळ रानबोथली च्या वतीने जगतगुरु तुकाराम महाराज,छञपती शिवाजी महाराज,संत गाडगे बाबा,संताजी जगनाडे महाराज,संत गोविंद स्वामी,घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर,समाजाला जागवण्याचे काम करणारे आधुनिक काळातील प्रबोधनकार अमर शहिद राजीव दिक्षीत,क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले,आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज,सावित्रीबाई फुले या महामानवांचा पुण्यतिथी महोत्सव नुकताच साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून हिरालाल धर्माजी बन्सोड मुख्याध्यापक जवराबोडी मेंढा,सचिनजी लिंगायत सरपंच ग्रामपंचायत रानबोथली,गोपालजी कुथे अध्यक्ष तंटा मुक्त समिती रानबोथली या सह बरेच मान्यवर यावेळी उपस्थित होते.या वेळी कार्यक्रमात सामुदायीक ध्यान,योगा प्राणायाम,रामधुन,रांगोळी स्पर्धा,सर्वधर्मीय सामुदायीक प्रार्थना व आरती,ग्रामसफाई,वृक्षारोपण,प्रश्नमंजुषा,भाषण स्पर्धा,सामुदायीक प्रार्थना,भजन असे बरेच उपक्रम कार्यक्रमा दरम्यान रानबोथली गावात राबविण्यात आले.तसेच गुरूदेव सेवा मंडळाच्या वतीने तंटा मुक्त गाव समिती चे अध्यक्ष गोपाल कुथे,व सदस्य शंकर जांभुळे,देविदास बावणे,भाविक चंडीमेश्राम,राजकुमार तुपट,मायाबाई निकम यांना शाल व श्रीफळ देऊन जाहीर सत्कार करण्यात आले.कार्यक्रम यशस्वी रित्या करीता गुरूदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थांनी फार मोलाचे सहकार्य केले.