अकोला: स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे प्रा.विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्यातीलच एक अनोखा उपक्रम म्हणजे सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळात यावर्षीही दिव्यांग सोशल फाउंडेशन तर्फे रक्तदान नेत्रदान व अवयव दानाचा संगीतमय कार्यक्रम संपन्न झाला.२१ ऑक्टोबर २०२३ रोजी जठारपेठ चौक येथील लोकराज्य नवदुर्गा उत्सव मंडळात सदर कार्यक्रमात श्रोत्यांनी रक्तदान व नेत्रदानाचा मोठा संकल्प केला.
या संगीतमय कार्यक्रमात प्रा.विशाल कोरडे,प्रा.अरविंद देव, प्रा.गजानन मानकर, अनामिका देशपांडे,नागेश उपरवट,सुनील कवीश्वर व नयना खोडे यांनी भक्ती गीते सादर केली.संगीतमय प्रस्तुती बरोबरच डॉ.संजय तिडके व अस्मिता मिश्रा यांनी रक्तदान, नेत्रदान व एक हात सहकार्याचा या उपक्रमाविषयी माहिती दिली. या उपक्रमांतर्गत दिव्यांगांनी तयार केलेल्या दिवाळी उत्पादने अत्यंत कमी दरात उपलब्ध असून त्यातून मिळणारा निधी हा दिव्यांगांच्या उपयोगात आणला जाणार आहे.
सामाजिक दिवाळीच्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी संस्थेच्या ०९४२३६५००९० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पुजा गुंटिवार,नीता वायकोळे,संजय फोकमारे,विजय कोरडे व प्रतिभा काटे यांनी केले आहे .