वरोरा :- देशात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक करण्यासाठी मोठमोठ्या रस्त्याची जाळे विणण्यात आले तरीही शेतकरी मात्र आपल्या शेतात जाण्याकरिता पांदन रस्त्याचा उपयोग करावा लागतो तो रस्ता चिखलमय झाल्याने शेतात जावे तरी कसे अशा विवंचनेत शेतकरी पडला आहे. देश 75 वर्षाचा सुवर्ण महोत्सवात जात असतांना नागरिक,शेतकरी यांना शुद्ध पाणी, पांदण रस्त्याचा आभाव अशा मूलभूत गरजा पूर्ण भागवू शकत नाही. हे देशाचे दुर्दैव म्हणावे की काय असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
सोईट - कोहपरा येथील शेतकरी वर्ग या अडचणीत सापडला आहे. या पांदन रस्त्यावर कमरेपर्यंत चिखल झाला असून या चिखलमय पांदणातून शेतीला लागणारे खते, अवजारे, ट्रॅक्टर, चार चाकी वाहने शेतापर्यंत पोहोचत नसल्याने खते,अवजारे खांद्यावर घेऊन जावे लागते. या पांदन रस्त्यावर जवळपास 800 एकर शेतकऱ्यांच्या जमिनी असून यातील 50 एकर जमीन माजी आमदार संजय देवतळे यांच्या मालकीची आहे. स्वर्गीय खासदार/आमदार यांनी दिमाखाने मोठे बोर्ड लावत पांदन रस्त्याचे उद्घाटनही केले. परंतु अद्यापही हे पांदन रस्त्याचे काम करण्यात आले नाही. तेव्हा जनप्रतिनिधीनी याकडे लक्ष घालून जगाच्या पोशिंद्याला न्याय देत पांदण रस्ताचे काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी परिसरातील शेतकरी करित आहे.