महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई यांचे अंतर्गत घेण्यात आलेल्या उन्हाळी २०२२ पॉलिटेक्निक चा निकाल नुकताच जाहीर झालेला असून यामध्ये महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटेक्निक बेटाळा ब्रम्हपुरीचा निकाल उत्कृष्ट लागलेला असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलेले आहे.
यामध्ये तृतीय वर्षातील स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतून डिकेश रामदासजी भांडेकर याला ७८.७९ % गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेला आहे. निलेश नामदेव दुधे याला ७७.८४ % गुण प्राप्त करून महाविद्यालयातून द्वितीय तसेच सुमित भगवान मुंनघाटे हा विद्यार्थी ७७.३७ % गुण मिळवून महाविद्यालयात तृतीय क्रमांकाचे उत्तीर्ण झालेला आहे.
तसेच महाविद्यालयातील १७-विद्यार्थ्यांनी ७० टक्के चे वर गुण मिळवून महाविद्यालयाचे शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
सर्व गुण प्राप्त विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री. देवेंद्र मुरारी पिसे, प्राचार्य श्री. सुयोग वा. बाळबुधे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शभेच्छा दिलेल्या आहेत.