वाशिम : वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदार संघातील, दारव्हा दिग्रस विधानसभा मतदार संघाचे, दिर्घानुभवी आणि लोकप्रिय आमदार तथा भटक्या विमुक्त समाजाचे आशास्थान असलेल्या शिंदे गटातील कट्टर शिवसैनिक संजय भाऊ राठोड यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेताच, कारंजा शहरातील, कारंजा तालुका भटक्या विमुक्त जातीजमाती संघाचे तालुका सचिव, ज्येष्ठ समाजसेवक संजय कडोळे, जि प समाज कल्याणचे माजी सभापती तथा बंजारा नेते, जयकिसनजी राठोड, आ .संजयभाऊ राठोड मित्र मंडळाचे संजय पवार दापुरा, हिम्मतराव मोहकर, माणिकराव पवार आखतवाडा, अर्जुन राठोड लोहगाव, संदिप काळे मुरंबी, भिमराव पवार, कैलास हांडे व इतर ना.संजयभाऊ राठोड यांच्या चाहत्यांनी, एकमेकांना पुष्पगुच्छ देवून तसेच पेढे भरूवून अभिनंदन केले आहे. तसेच यावेळी, मागासलेल्या व दुर्लक्षित अशा वाशिम जिल्ह्याच्या विकासाचा अनुशेष भरल्या जाण्याकरीता आणि बंजारा काशी तिर्थक्षेत्र पोहरादेवीच्या विकासाकरीता, पालकमंत्री म्हणून ना.संजयभाऊ राठोड यांची निवड व्हावी. अशी अपेक्षा संजय कडोळे, ज्येष्ठ बंजारा नेते जयकिसन राठोड यांनी व्यक्त केली आहे.