वाशिम : समाजसेवकांना देण्यात येणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण या महाराष्ट्र शासनाच्या राज्यस्तरीय पुरस्कारा करीता,महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी काढलेल्या जाहिराती नुसार,गेल्या पाच वर्षात इ सन 2019-20 पासून,जिल्ह्यातील अनेक सेवाव्रती समाजसेवक आणि लोककलावंतानी मागील पाच वर्षात वेळोवेळी,सहाय्यक आयुक्त, कार्यालय समाज कल्याण महाराष्ट्र शासन वाशिम यांचे मार्फत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत आपआपले प्रस्ताव सादर केलेले होते. विशेष म्हणजे काही वर्षापूर्वी मुंबई येथे दि 26 जून 2022 रोजी,सामाजिक न्याय मंत्रालयाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन सुद्धा केले होते. त्याकरीता जिल्हयातील लाभार्थ्यांना कळविण्यात येवून, सहाय्यक आयुक्त कार्यालयामार्फत त्यांचे चारित्र्य पडताळणीचे दाखले सुद्धा घेण्यात आलेले होते.परंतु नियोजीत कार्यक्रमापूर्वीच राज्यसभा निवडणूक झाली आणि दि 20 जून 2022 रोजी महाविकास आघाडीमधील आमदार आणि मंत्री आसाम मधल्या गोहाटीला निघून गेले आणि सरकार गडगडले. त्यामुळे वेळेवर कार्यक्रम स्थगीत करण्यात आला. तेव्हापासून विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा सातत्याने, डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार सोहळा घेण्याची शासनाला वारंवार मागणी करीत होते. नुकतेच त्याकरीता दि 24 जानेवारी 2024 रोजी विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांच्या नेतृत्वा खाली संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथे "निर्णायक क्रांतिकारी धरणे आंदोलन" सुद्धा केले होते. तसेच केन्द्रिय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले,मुख्यमंत्री शिंदे साहेब यांचे स्विय सहाय्यक तसेच उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांचे अव्वल सचिव अमोल पाटणकर यांची भेट घेऊन त्यांचेशी संवाद साधून पुरस्कार वितरण सोहळा घेण्याची वेळोवेळी मागणीही केली होती. अखेर शासनाने विदर्भ लोककलावंत संघटनेची मागणी लक्षात घेऊन,येत्या दि. 12 मार्च 2024 रोजी, नॅशनल सेंटर फॉर परफार्मिग जमशेदजी भाभा नाटयगृह ,N C P A मार्ग नरिमन पॉईन्ट मुंबई येथे भव्य दिव्य अशा पुरस्कार सोहळ्याचे शाही आयोजन केले आहे. हा कार्यक्रम आयोजीत होणे हे अध्यक्ष संजय कडोळे यांच्या विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा च्या सततच्या पाठपुराव्याचे यश असल्याचे सामाजिक कार्यकर्ते प्रदिप वानखडे यांनी म्हटले आहे. परंतु महत्वाचे म्हणजे सदहू पुरस्कार कार्यक्रमात अकोला व अमरावती जिल्ह्याला झुकते माप दिल्या गेले असून सन 2019 ते 2023 या चार वर्षाकरीता तमाम महाराष्ट्रातील एकूण 300 पुरस्कारार्थी व एकूण 93 संस्थांना गौरवांकित केल्या जाणार असून त्यामध्ये सन 2020-21 च्या पुरस्कारा करीता वाशिम जिल्हयातील मोहन रामभाऊ भगत रा. नालंदानगर वाशिम ही एकमेव भाग्यवान व्यक्ती पुरस्कारार्थी ठरली असून,केवळ डॉ बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशिय संस्था तोंडगाव ता. जि.वाशिम ह्या एकमेव संस्थेची डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराकरीता निवड करण्यात आलेली आहे. तर बाजूच्या अकोला जिल्ह्यातील मात्र एकूण आठ व्यक्ती पुरस्कारा करीता पात्र ठरलेल्या असून अमरावती जिल्ह्यातील एकूण बावीस व्यक्तीची पुरस्काराकरीता निवड झालेली आहे.मात्र वाशिम जिल्हयात एकापेक्षा एक धडाडीचे अष्टपैलू लोककलावंत असतांना आणि प्रसंगी घरादारावर तुळशीपत्र ठेवून तनमनधनाने सेवाव्रती कार्य करणारे सच्च्या समाजसेवकांची शासनाने दखल घेऊन निवड न केल्याने,त्यांचेवर हेतुपुस्परपणे अन्याय करण्यात आल्याची भावना वाशिम जिल्ह्यातील कलावंत समाजसेवकाकडून व्यक्त होत आहे. . . *डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारापासून आकांक्षित वाशिम जिल्ह्यातील सच्च्चा कलावंताना व समाजसेवकांना वंचित ठेवणे. हा त्यांचा अपमान नसून जिल्ह्यातील पालकमंत्री आणि आमदारांचे ते अपयश आहे. -संजय कडोळे.* गेल्या पाच वर्षापासून प्रलंबीत असलेला पुरस्कार सोहळा शासनाने आयोजीत तर केला परंतु सदर कार्यक्रमामध्ये आधीच आकांक्षित व मागासलेल्या जिह्याला वंचित ठेवण्यात आले आहे.यामध्ये उल्लेखनिय म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराकरीता शासनानेच मोठ्या वृत्तपत्रांना भरभरून जाहिराती देऊन इच्छुक पुरस्कारार्थींचे प्रस्ताव मागीतले होते व त्यानुसार सन 2019 पासून 2019, 2020, 2021, 2022,2023 इत्यादी वर्षात जिल्ह्यातील अनेक सेवाव्रती संस्था,समाजसेवक व लोककलावंतानी स्थानिक आमदाराच्या शिफारशीने प्रस्तावही सादर केलेले होते. त्यानंतर जून 2022 मध्ये सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांचेकडून मुंबई येथे पुरस्कार सोहळा 26 जून 2022 रोजी होणार असल्याचे इच्छुकांना सांगण्यात आले होते व त्यांचेकडून जिल्हा पोलीस अधिक्षक वाशिम यांचे मार्फत इच्छुक पुरस्कारार्थीचे चारित्र पडताळणी प्रमाणपत्र मागण्यात आले होते. मात्र राज्यसभा निवडणूकीनंतर काही मंत्री व आमदार गोहाटीला निघून गेले . महाविकास आघाडी सरकार कोसळले व कार्यक्रम प्रलंबित ठेवण्यात आला. त्यानंतर जून 2023 मध्ये 2019 च्या प्रस्तावा करीता ऑगष्ट 2023 मध्ये सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय वाशिम यांचे कडून परत तिसऱ्यांदा चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मागून घेण्यात आले होते.त्यामुळे 2019 -20 च्या इच्छुक पुरस्कारार्थीना देखील आपली पुरस्काराकरीता निवड झाल्याची खात्री पटली होती. मात्र सामाजिक न्याय विभागाच्या दि 07 मार्च 2024 च्या शासन निर्णयात जिल्हयातील एकमेव संस्था आणि एकमेव पुरस्कारार्थी मोहन भगत यांचेच 2022 च्या यादीत नाव असून 2019 च्या निवड झालेल्यांना डावलण्यात आल्याने खऱ्याखुऱ्या सेवाव्रती समाजसेवकावर हा अन्याय असून, हे समाजसेवकांचे अपयश नसून जिल्ह्यातील आमदार व पालकमंत्री यांचे अपयश असून, त्यांची शिफारस असतांनाही इच्छुक पुरस्कारार्थी यांना डावलले जात असेल तर,सरकार दरबारी त्यांचे वजन नसल्याचे स्पष्ट होत असल्याची खंत विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी बोलून दाखवीली असून लोकप्रतिनिधी या नात्याने आता त्यांनी पुरस्कार निवड प्रक्रियेच्या चौकशीची मागणी करण्याची विनंती केली आहे.