कारंजा (लाड) : स्थानिक कारंजा नगरी अतिप्राचिन,ऐतिहासिक, सांस्कृतिक व सर्वधर्मियांना समभाव शांती संयम एकोप्याने नांदविणारी सुवर्णनगरी किंवा कस्तुरीनगरी असतांनाही आजता गायत विकासा पासून लांब असलेली उपेक्षीत नगरी राहीलेली आहे.येथे संपूर्ण आशिया खंडातील पहिली बाजारपेठ असतांना आणि एकेकाळचे व्यापारी शहर असतांनाही कारंजा येथे एम.आय.डी.सी. आणि उद्योग कारखाने नसल्यामुळे मजूर,कामगार सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम नाही.चांगल्या दर्जेदार शिक्षणाची येथे विद्यालये असतांनाही पदवीधर उच्च शिक्षणाची व्यवस्था नाही.सोहळ काळवीट अभयारण्य असतांना पर्यटकाकरीता पर्यटनाची व्यवस्था नाही.जैन धर्मियांची पवित्र तिर्थस्थळ आणि दत्तावतार श्री नृसिह सरस्वती स्वामी यांच्या जन्मस्थळी श्री गुरुमंदिर संस्थान सारखे विश्वप्रसिद्ध असलेले, "अ" श्रेणीचे तिर्थस्थळ असल्यामुळे सरसंघचालक,राज्यपाल,केन्द्रिय मंत्री,विविध राज्याचे मुख्यमंत्री,मंत्री यांचे वेळोवेळी आवागमण होत असूनही,पर्यटन व तिर्थक्षेत्र विकासाची कोणतीच कामे झालेली नाहीत.त्यामुळे शासकिय योजना व विकासा पासून दुर्लक्षित व उपेक्षित असलेल्या कारंजा नगरीचा कायापालट होऊन विकास होणे अत्यावश्यक आहे.त्याकरीता शासनाने पर्यटन व तिर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करून कारंजा नगरीची विकास कामे सुरु करून,येथील मजूर,कामगार,सुशिक्षीत बेरोजगारांना कामे उपलब्ध करून द्यावीत.याकरीता स्थानिक विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाच्या वतीने,महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त असलेले,ज्येष्ठ दिव्यांग समाजसेवक संजय कडोळे हे शुक्रवार दि 08 डिसेंबर 2023 रोजी दुपारी O1 : 00 वाजता विद्यमान तहसिलदार साहेबांमार्फत मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्री - शासनाला निवेदन देणार आहेत.तरी त्यांना अनुमोदन देण्याकरीता कारंजा येथील सर्वच क्षेत्रातील कार्यकर्ते, सर्वपक्षिय राजकिय कार्यकर्ते, वकील, डॉक्टर, पत्रकार, सुशिक्षीत बेरोजगार व कारंजेकर नागरीकांनी उपस्थित रहावे असे विनम्र आवाहन करण्यात येत आहे.