वाशिम : महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट-क परीक्षा- 2023 अन्वये विविध संवर्गाची ऑनलाईन परीक्षा शहरातील डिजीटल परीक्षा परीसर, 1 ला मजला, गुलाटी टॉवर, शासकीय पॉलीटेक्नीक कॉलेज समोर, रिसोड रोड, वाशिम येथे 28 ऑक्टोबरपर्यंत आणि 2 व 3 नोव्हेंबर 2023 रोजी तीन सत्रात ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
परीक्षेच्या दिवशी परीक्षा केंद्रावर 100 मीटर परिक्षेत्रात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच परीक्षेसंबंधी गैरप्रकार घडू नये. यासाठी परीक्षा केंद्रावर जिल्हादंडाधिकरी बुवनेश्वरी एस.यांनी फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू केले आहे.
ही परीक्षा सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजता दरम्यान तीन सत्रात घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रावर ओळखपत्राशिवाय प्रवेश मिळणार नाही. परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात शासनाकडून नियुक्त केलेले अधिकारी व कर्मचाऱ्याव्यतिरीक्त इतर व्यक्तीस मनाई राहणार आहे. परीक्षा केंद्रावर 100 मिटरच्या आत रस्त्यावरुन वाहने नेण्यास मनाई राहील. परीक्षा केंद्राच्या 100 मिटरच्या परीसरातील सर्व सार्वजनिक टेलीफोन, एसटीडी, आयएसडी, झेरॉक्स, फॅक्स, ईमेल, ध्वनीक्षेपके आदी सुविधांवर बंदी घालण्यात आली आहे. परीक्षा केंद्रावर मोबाईल फोन, वायरलेस सेट, रेडीओ, दूरदर्शन, कॅलक्युलेटर, संगणक वापरण्यावरसुध्दा बंदी घालण्यात आली आहे.
परीक्षा केंद्राच्या परीसरात प्रवेश करतांना 4 पेक्षा जास्त व्यक्तींना प्रवेश करता येणार नाही. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.