मंगळागौर खेळाला विशेष आकर्षण म्हणून चित्रपट अभिनेत्री सरला वावधाने आणि वैदर्भिय सौंदर्य सम्राज्ञी विजेती करणा कदम यांची असणार उपस्थिती.
कारंजा लाड:-श्रावण मास म्हटले की हिंदू संस्कृतीचा आणि हिंदू धर्मियांचा पवित्र मास,सर्वत्र हिरवळीचे साम्राज्य,आणि स्त्री वर्गाचा आनंददायी महिना,आणि याच पवित्र महिन्याचे महत्व जाणून आविष्कार महिला मंच घेऊन येत आहे सम्पूर्ण विदर्भात कधीही न झालेला अवाढव्य कार्यक्रम म्हणजे '"खेळ खेळूया मंगळागौरचा" दिनांक १७ ऑगस्ट २०२५ रविवार रोजी कारंजा येथील शेतकरी निवास येथे असंख्य महिला भगिनी एकत्र येऊन सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत मंगळागौर खेळणार आहेत. सदरहू कार्यक्रमात मराठी चित्रपट,"तेरवं" फेम अभिनेत्री सरला वावधाने तर वैदर्भीय सौंदर्य सम्राज्ञी विजेती करुणा कदम या विशेष आकर्षण राहणार असून,कारंज्यामधील महिलांना एकत्रीकरणं करून एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सर्वत्र आविष्कार महिला मंच चे कौतुक होत आहे या खेळ खेळूया मंगळागौर कार्यक्रमात महिला वर्गांना साडी,दागिने,तथा इतर महिला उपयोगी साहित्य खरेदी करता येणार असून असंख्य चविष्ट मेनू चा उपभोग घेता येणार असून सम्पूर्ण महिलांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्षा सौ. शीतलताई काकडे उपाध्यक्ष मोना देशपांडे ,वंदना खंडारे,प्रीती धाकतोड,एकता गायकवाड ,शुभांगी जैन,सचिव श्रद्धा रगडे,सहसचिव कविता ताई पाटील,प्रतीक्षा देसाई,कोषाध्यक्ष मेघा ताई गुल्हाने,
सह कोषाध्यक्ष सौ नीता पापळकर, प्रकल्प प्रमुख राणी म्हातारमारे,स्नेहा पवार संघटक कल्पना अलमवार,स्नेहा जैन, हर्षा अंधारे, सुलोचना मुंदे, योगिता नेमाडे,सीमा सातपुते, सपना चौधरी,सल्लागार समिती ललिता ताई माकोडे,
शारदाताई भुयार,ॲड मंगलाताई नागरे,माधुरीताई पापडे यांनी केले आहे. अविष्कार कडून जाहिर करण्यात आल्याचे ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी कळवीले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....