अकोट :
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा अकोट तालुका मेळावा शहरातील यशोदा माध्यमिक विद्यालय येथे दि १९ मार्च रोजी पार पडला. यावेळी सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याला अकोला जिल्ह्यातील सातही तालुका कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित होते. यावेळी अकोट तालुका महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वार्षिक अंकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच विजय कोंबे राज्याध्यक्ष यांच्या उपस्थितीत अनेक शिक्षकांनी समितीमध्ये प्रवेश घेतला. ज्या मध्ये श्री अनिल बहाकर, सौ लता अनिल बहाकर,रत्नमाला घुमारे,सौ माया खपरे, सौ. राजकन्या चौधरी, मोहन खोब्रागडे,सचिन रंधे आदी लोकांनी प्रवेश घेतला.
अकोट शाखेच्या यु-ट्यूब चॅनेलचे तसेच संपर्क कार्यालयाचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.निवृत्ती राऊत होते. यावेळी अकोट शाखेच्या वतीने मेळाव्याचे प्रमुख सत्कारमूर्ती श्री.विजय कोंबे, आणि अमरावती विभागीय शिक्षक बँकेचे अध्यक्ष श्री.गोकुलदास राऊत यांचा मानपत्र शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. मेळावा चे उद्घाटन राजेश देशमुख जिल्हाध्यक्ष शिक्षक समिती अकोला यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी विचारपीठावर विजय कोंबे, गोकुलदास राऊत, राजेश देशमुख यांच्यासह मारोती वरोकार, गोपाल सुरे, ज्ञानेश्वर टोहरे, प्रशांत आकोत, किशोर कोल्हे, संजय इंगळे, अजयानंद पवार,अनिल पिंपळे, दिनेश बोधनकर, सुधीर डांगे, अविनाश आगाशे, विनोद भिसे, निलेश कवडे, दीपक बोडखे, अनंत हिरुळकर, नागेश सोळंके, राजेंद्र थारकर, सौ शिवानी जोशी, अर्चना दाभेराव ,सचीन ठोंबरे, राजाराम म्हैसने, केशव देशमुख, अतिश तराळे, नितीन भागवत, राजेश नाकट, उमेश तिडके, प्रविण पुंड, गणेश रावरकर , गजानन बिल्लेवार ,यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अकोटचे सरचिटणीस विनोद तळोकार यांनी तर आभारप्रदर्शन शिवशंकर खंडेराय यांनी केले. शिक्षक समितीचा तालुकास्तरीय मेळावा यशस्वी करण्यासाठी कैलास देशमुख, शिवशंकर खंडेराय, विनोद वसो, गणेश केदार, धनराज कंकाळ, गजानन नवलकार, रामदास पंधरे, प्रमोद पिंप्राळे, अजय अस्वार, राजेंद्र रंधे, आनंद तायडे, आशिष अस्वार, ज्ञानेश्वर खापरकर, अरुण फुलारी, हरिदास पंधरे, सुरेंद्र दिवणाले, मनोज रतन सचिन रंधे, निलेश बहाकर, ज्ञानेश्वर भोयर, मनीष ढोले यांनी अथक परिश्रम घेतले.
त्याचप्रमाणे या मेळाव्यास महिला वर्गातून शिवानीताई जोशी ,अर्चना दाभेराव, सौ माया खापरे, सौ छाया चौधरी, रत्नमाला घुमारे, अनिता भास्कर,लता पुराम, लता बहाकर, रागिणी खोटरे, राजकन्या चौधरी, मंगला सिडाम, अर्चना अस्वार, भारती अस्वार, विजया राऊत, कल्पना ठग, राजपूत मॅडम, लता भावे, सौ ढवळे मॅडम, सौ बोडखे मॅडम, सौ दर्शना खापरकर मॅडम. मंगला तळोकार सौ शिला ज्ञानेश्वर भोयर,आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
आपल्या प्रतिक्रिया द्या....