नाशिक (वाशिम जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : भारतिय सैन्यामधून सेवानिवृत्ती घेतलेल्या जिल्हा : नाशिक, तालुका : बागलाण येथील जायखेडा परिसरात राहणारे सेवानिवृत्त वयोवृद्ध माजी सैनिक यांनी पुढील आयुष्य वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांच्या सेवे साठी अर्पण करून राजकिय पक्ष व राजकारण विरहित जय संतोषी माँ जेष्ठ नागरिक जनजागृती संघटनेचे अध्यक्ष या नात्याने मुख्यमंत्री ना. एकनाथ साकडे यांना,वयाची साठ वर्षे पूर्ण करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक घोषीत करून,ज्येष्ठ नागरिकांच्या शासकिय योजनांचा लाभ त्वरीत मिळवून देण्याची विनंती केली आहे.महत्वाचे म्हणजे कोणताही ओळख परिचय नसतांना त्यांनी कारंजा येथील युवाक्रांती समाचारचे वाशिम जिल्हा प्रमुख,दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांचा, संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत युवाक्रांती समाचार पोर्टलवर संपर्क साधून भ्रमणध्वनी क्रमांक मिळवून त्यांचेशी संवाद साधला. आणि आपण जय संतोषी मॉ ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिक जनजागृती संघटनेच्या वतीने ज्येष्ठ नागरिक सहकारी सर्वश्री दामोधर पवार, पुंडलिक जगताप, विश्वनाथ अहिरे, निंबा शिवाळे, अभिमन जगताप, देविदास अनारे, शिवाजी शेवाळे, वसंत खैरनार, लियाकतखॉ महेबुबखाँ पठाण, बाळासाहेब बागुल, रामदास जगताप, बबन ठाकरे, भाष्कर अहिरे, महिला सहकारी सौ आशालता गोसावी, श्रीमती मंगला बागुल, श्रीमती सुमनताई जगताप यांचेसह लवकरच मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांना भेटून,वयाची साठ वर्ष पूर्ण झालेल्या महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना ज्येष्ठ नागरिक म्हणून दर्जा देण्याची आणि ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या सर्व शासकिय सोई सुविधा देण्याची मागणी करणार असल्याचे सांगीतले.नाशिक जिल्हयात राहणाऱ्या "एका माजी सैनिकाची सेवेत कार्यरत असतांना देशभक्ती कायम होती तर सेवानिवृत्ती नंतर समाजभक्ती कायम असल्याचेच यावरून दिसून येते." तसे पाहीले तर आज दिवसेंदिवस माणसाचे आयुष्यमान कमी होत चालले असून, "पस्तिशी चाळीसीनंतर मनुष्य वृद्धत्वाकडे झुकत चालला असल्याने साठ वर्षे वयोगटाच्या नागरिकांना निवृत्त घोषीत करून, ज्येष्ठ नागरिकांचे न्याय्य हक्क मिळायलाच हवेत."असे माजी सैनिक सुरेशराव बोरसे यांना समर्थन देतांना दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी म्हटले आहे. साठ वर्ष वयोगटाच्या प्रत्येक नागरिकाला शासनाने मोफत अन्नधान्य रेशन व आरोग्य सुविधा, श्रावण बाळ योजनेंतर्गत, दरडोई शंभर रुपये प्रमाणे तिन हजार रुपये मासिक निवृत्ती वेतन आणि अनाथ बेघर निराधार नागरिकांना निवार्याकरीता मोफत घरकुल सुद्धा शासनाने उपलब्ध करून घ्यायलाच हवे असेही त्यांनी म्हटले असल्याचे ज्येष्ठ दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी कळविले आहे .