कारंजा : हभप मधुकर महाराज खोडे यांच्या व्यसनमुक्ती समाजप्रबोधनाने भारावून व्यसनमुक्ती कार्य करणारे कारंजा येथील, राज्य शासन पुरस्कार प्राप्त "जय हो स्वच्छ भारत अभियान" लघुचित्रपटाचे निर्माते रोमिल अरविंद लाठीया हे विविध संस्था संघटनाच्या माध्यमातून सातत्याने समाजसेवेत कार्यरत असतात. त्यांच्या या समाज कार्याची दखल घेऊन, नागपूरच्या मदत सामाजिक संस्थेने त्यांना सन २०२२ च्या, राज्यस्तरिय छत्रपती शिवाजी महाराज आदर्श समाजसेवक पुरस्कारा करीता निवड केलेली होती. काही अपरिहार्य अडचणींमुळे रोमिल लाठीया हे पुरस्कार समारंभाला हजर न राहू शकल्याने त्यांच्या वतीने प्रदिप वानखडे यांनी सदरहू पुरस्कार लाँगमार्च प्रणेते प्रो. जोगेन्द्र कवाडे यांच्या हस्त स्विकारला होता. सदर्हू कार्यक्रमाचे आयोजन नागपूर येथील श्री गुरुदेव सेवाश्रम, रमण तारांगणा जवळ, सुभाष रोड नागपूर येथे अध्यक्ष डॉ.प्रा. प्रकाश सोनक तथा सचिव दिनेश बाबू वाघमारे यांनी केलेले होते. नुकताच कारंजा येथे रोमिल लाठीया यांचे निवासस्थानी जावून त्यांना पुरस्कार सोहळ्याचे प्रमुख पाहूणे संजय कडोळे, विजय खंडार, गोपिनाथ डेंडूळे, उमेश अनासाने, प्रदिप वानखडे यांचे हस्ते सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि भारतिय संविधानाची प्रत देऊन प्रदान करण्यात आला. त्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. पत्रकार विजय खंडार, डॉ. इम्तियाज लुलानिया, डॉ.ज्ञानेश्वर गरड, मिंटू सागानी आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.