ब्रम्हपुरी परिसरात अतिवृष्टीमुळे धान व इतर पिकांचे नुकसान झाले धान पाण्यात बुडाल्याने उत्पादनात घट झाली तसेच मोठ्या प्रमाणावर पांढरा लोम म्हणजेच पेरवा निसवला असल्यामुळे त्यात धनाचा एकही कडध्यान नाही. या चिंतेने धान्य कसे कापावे व कसे पिसावे यासाठी लागलेला खर्च सुद्धा निघणार नाही तसेच आजपर्यंत उत्पादन खर्च केलेला आहे तो सर्व व्यर्थ जाईल या विवंचनेने ग्रासलेल्या शेतकऱ्याची व्यथा आहे.
या परिसरात पिंपळगाव,खांब तळोदी, नवरगाव, सोंद्री अर्हेर नवरगाव, चिखलगाव या संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. तरी सर्वे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी तालुका ब्रह्मपुरीचे उपाध्यक्ष श्री अनिल कांबळे केली आहे.