कारंजा (लाड) : स्वपक्षाला आदर्श,स्वच्छ,नितीमत्ता असलेले राष्ट्रीय पक्ष म्हणून मिरविणाऱ्या पक्षश्रेष्ठींनी विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर चुकीचे निर्णय घेऊन स्वपक्षाच्या दावेदार निष्ठावंतानाच डावलून इतर पक्षातील नेत्यांना जवळ करीत उमेद्वारी बहाल केल्यामुळे, प्रत्येक पक्षाच्या आदर्श प्रतिमेला तडे गेले आहेत.आणि त्यामुळे एकीकडे पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांवर "कोणता झेंडा घेऊ हाती . . ?" असे म्हणायची वेळ आली आहे. तर दुसरीकडे मतदार सुद्धा संभ्रमात पडलेले आहेत. कार्यकर्ते आणि मतदार दोघांवरही पक्षाला मतदान करायचे की व्यक्तीला निवडायचे असा पेच निर्माण झालेला आहे. आणि ही वेळ प्रत्येक पक्षाच्या शिर्षस्थ नेत्यांमुळे आलेली आहे. यामागील वास्तव शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला तर असे दिसून आले की, प्रत्येक राजकिय पक्षासोबत रहाणारा, प्रत्येक पक्षाच्या विचारधारेचा फार मोठा मतदार वर्ग असतो व त्या मतदार वर्गाची उम्मेद किंवा अपेक्षा, त्या त्या पक्षाच्या नेत्याकडे लागून राहीलेली असते. मात्र अचानक एखादे वादळ येवून महापूर व्हावा. आणि त्यामध्ये सर्व परिस्थिती बदलून जावी. त्याप्रमाणे राजकीय उलथापालथ होऊन इकडचे नेते तिकडे आणि तिकडचे नेते इकडे झाल्यानंतर मतदारांपुढे नेमके मतदान करावे तरी कुणाला ? पक्षाला की नेत्याला हा फार मोठा प्रश्न निर्माण होतो ? आणि त्याचे उत्तर शोधणेच कठीन होऊन बसते.त्या परिस्थितीत प्रचंड प्रमाणात बंडखोरी होते. व बंडखोर नेते ही बंडखोरी स्वतःच्या पक्षासोबत तर करतातच पण इतर पक्षात जाऊन तेथील वातावरण सुद्धा गढूळ करून टाकतात.मग मात्र ह्या बंडखोराच्या सत्तेच्या लालसापोटी मतदारांनाही निर्णय घेणे जड जात असते.तसेच निरनिराळ्या पक्षात एकाच धर्माचे नेते वेगवेगळ्या ठिकाणी विखुरले गेलेत तर मात्र देश, राज्य, जिल्हा तालुका ; एखादा धर्म,भाषा व प्रत्येक व्यक्तीचे नुकसान होते आणि त्याचा लाभ कोणती ही प्रत्यक्ष चर्चा न होता किंवा कोणतीही अपेक्षा नसतांनाच दुसऱ्याच कुणाला तरी मिळते त्यावेळी मात्र "आंधळं दळतं कुत्रे पिठ खाते." अशी होवून बसते.आज कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघात निव्वळ राजकिय हव्यासापोटी "नेतेमंडळी खाती तुपाशी तर निर्दोष मतदार जनता उपवाशी" आणि कार्यकर्त्याची अवस्था तर "ना घरका ना घाटका" अशी होवून गेली आहे.मतदारसंघ आणि मतदार यांची दयनिय अवस्था झाल्याचे चित्र दिसत आहे. तसेच कोणताच राजकिय पक्ष किंवा उमेद्वार कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाच्या विकासाचे मुद्दे सांगत नाही मतदार संघातील लोकांचे उच्चशिक्षण, आरोग्य,रोजगार ह्या समस्यांवर बोलायला कुणीच तय्यार नाही. मतदार संघ आणि मतदारांच्या विकासासाठी ना कुणी पत्रकार परिषद घेत आहे.ना कुणी जाहीर बोलतपणे आहे. तिर्थक्षेत्र विकास आराखडा,सोहोळ अभयारण्य, उच्चशिक्षण,रोजगार निर्मिती साठी कोणत्याच उमेद्वारांची मानासीकता दिसून येत नाही. केवळ साम दाम दंड भेद ही शस्त्रे वापरून काहीही करून स्वत: आमदार होण्याची किंवा स्वतःचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. आणि त्यांची ही धडपड लोकशाहीची मारक ठरणारी आणि कारंजा मानोरा मतदार संघाचे फार मोठे नुकसान घडविण्यास कारणीभूत ठरणार आहे. या निवडणूकीनंतर हा मतदार संघ नको त्या व्यक्तीच्या नेतृत्वात जाऊन आणखी दहावीस वर्षांचे नुकसान घडवून आणणार आहे. आणि त्याला कारणीभूत स्वतःच्या इशार्यावर राजकिय पक्षाच्या शिर्षस्थ नेत्यांना नाचविण्याचे पाप करणारे स्थानिक उपद्रवी नेते असणार आहेत.एवढ मात्र निश्चित.असे आपले मत महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे कारंजेकर यांनी व्यक्त केले आहे.