आज दिनांक 17 सप्टेंबर 2022 रोजी विश्वभूषण तथा देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी पंतप्रधान मा. श्री.नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्राथमिक आरोग्य केंद्र गांगलवाडी येथे रुग्णांना फळ वाटप आणि सफाई कर्मचारी श्री. सिकंदरजी तांबे यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
याक्षणी रामलाल महादेव दोनाडकर माजी सभापती तथा तालुकाध्यक्ष,भाजयुमो ब्रह्मपुरी तालुका,ज्ञानेश्वरजी भोयर माजी सरपंच तथा भाजपा जिल्हा कार्यकारणी सदस्य चंद्रपूर, भाऊरावजी ठवकर उपाध्यक्ष सेवा सहकारी सोसायटी तळोधी, अविनाशजी मस्के (इंजिनियर) संयोजक,भाजपा सोशल मीडिया टीम ब्रह्मपुरी, धीरज पाल सहसंयोजक,भाजपा सोशल मीडिया टीम ब्रह्मपुरी, चुमदेवजी जांभुळकर माजी उपसरपंच गांगलवाडी इत्यादी मान्यवरांच्या हस्ते रुग्णांना फळवाटप आणि सफाई कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.रुपेश गावळकर ,एस के धोटे आरोग्य सहाय्यक, डी. जी.राऊत आरोग्य सहाय्यक व प्राथमिक आरोग्य केंद्रातील समस्त आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.