गडचिरोली,(जिमाका)दि.21: दिनांक 20/09/2022 रोज मंगळवार ला जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय गडचिरोली यांच्या वतीने शासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक आश्रमशाळा लाहेरी, ता. भामरागड येथे बाल संरक्षणविषय मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आले.
आश्रमशाळेतील विद्यार्थ्याना सुरक्षित स्पर्श व असुरक्षित स्पर्श, बालकांचे अधिकार, बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 या कायद्याची माहिती, बालविवाह प्रतिबंधक कायदा, बाल कामगार अधिनियम, पॉक्सो ॲक्ट, बाल संरक्षणविषय काम करणाऱ्या जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय, ग्रामस्तरीय यंत्रणा याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच एखाद्या बालकांवर मानसिक, शारीरिक, लैंगिक अत्याचार, तसेच अडचणीत सापडलेल्या बालकांनी 1098 या क्रमांकांवर संपर्क साधावा अशी माहिती देण्यात आली.
सदर कार्यक्रम जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले. यावेळी सदर कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून मास्टर ट्रेनर जयंत जथाडे, संरक्षण अधिकारी कवेश्वर लेनगुरे, क्षेत्र कार्यकर्ता रविंद्र बंडावार यांनी मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाला उपस्थित शाळेतील अधिक्षक एन टीसे, अधिक्षिका जी बोमावार, शिक्षक टी गंदे, आर आलाम, डी. सिडाम, उपस्थित होते.