भद्रावती- तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा वायगाव (तू) येथील सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका सौ. रेखा भारत गायकवाड यांचा वाढदिवस नुकताच शाळेने साजरा केला. यात विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या शिक्षिकेला आपल्या परीने वाढदिवसाची भेट देऊन त्यांचा वाढदिवस साजरा केला.
यात आदर्श शिक्षिका राहलेल्या सौ रेखा मॅडम नि आपल्या ज्ञानदानाच्या सेवेत खंड न पडू देत शाळेला शाळेच्या उपयोगी एक मोठी भेटवस्तू देऊन कृतज्ञता जपली.
त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे.