वाशिम : सर्व मुख्याध्यापकांना समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, वाशिममार्फत राबविण्यात येणाऱ्या मागासवर्गीय मुला-मुलींसाठी शिष्यवृत्तीचे विविध योजनेचे अर्ज सादर करण्याकरीता वेळापत्रकानूसार कार्यवाही करण्याबाबत कळविले होते. त्यानुसार पंचायत समितीमार्फत काही अर्ज प्राप्त झाले आहे.
परंतु बऱ्याच शाळांच्या मुख्याध्यापकांनी अद्यापपर्यंत शिष्यवृत्ती तसेच दिव्यांग लाभार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे प्रस्तावसुध्दा सादर केलेले नाही. तरी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, वाशिम येथे 22 नोव्हेंबर रोजी आयोजित कॅम्पमध्ये शिष्यवृत्तीचे प्रस्ताव सादर करावे.
त्यानंतर प्राप्त होणाऱ्या शिष्यवृत्तीचे प्रस्ताव स्विकारल्या जाणार नाही. असे जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी मारोती वाठ यांनी कळविले असल्याचे वृत्त महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषद वाशिम कार्यालयाला प्राप्त झाले असल्याचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी सांगीतले आहे.