तेलंगणा येथील मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या मुख्यमंत्री निवासला जाऊन, स्वराज्य शेतकरी संघटनेचे संस्थापक जयकुमार बेलखडे व जयदादा मित्र परिवार महाराष्ट्र सचिव हर्षाताई जयकुमार बेलखडे व उपस्थित संघटनेतील पदाधिकारी यांनी भारत राष्ट्र किसान समितीला मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्तीथीमध्ये स्वराज्य शेतकरी संघटनेनी पाठींबा दिला यावेळेस के चंद्रशेखर राव यांनी शेतकरी शेतमजूर यांच्या बद्दल तेलंगणा व्हिजन वापरून महाराष्ट्रातील जनतेच्या, शेतकरी व शेतमजूर यांच्या विकासाच्या कल्याणकारी योजना व सामान्य माणसाच्या आणी प्रत्येक समाजातील व्यक्तीची अडचण सोडविण्यासाठी आम्ही तत्पर आहो व तेलंगणा विकास व्हिजन बघून नक्कीच संपूर्ण महाराष्ट्रतील मायबाप जनता मला साथ देईल असे विधान के. चंद्रशेखर राव यांनी यावेळी दिले यावेळी जयदादा बेलखडे यांनी आर्वी विधानसभा शेत्रातील व विदर्भातील उपस्थीत असलेल्या शेतकरी शेतमजूर व सामान्य माणसाच्या समस्या के चंद्रशेखर राव यांच्या समोर मांडल्या आणि यांच्या पुढील विकास नीती बद्दल चर्चासत्र केले तेलंगना सरकार यांचे व्हिजन यांची नीती नक्कीच महाराष्ट्रातील शेतकरी व शेतमजूर आणि सामान्य माणसाच्या हिताची आहेव पोषक आहे व विदर्भातील थोर संत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या भजनाच्या माध्यमातून सांगून त्यावेळी आपल्याला सांगून गेले की "अब काहेको धूम मचाते हो दुखवाकर भारत सारे आते है नाथ हमारे" या भजनाची पूर्तता नक्कीच सार्थक होईल असे मला वाटते म्हणुन मी माझ्या आर्वी विधानसभेच्या शेतकरी शेतमजूर व सामान्य मायबाप जनतेच्या विकासासाठी मी भारत राष्ट्र किसान समितीला पाठींबा दिला व अबकी बार किसान सरकार असा जयघोष करुन शेतकरी लोकांच्या हितासाठी व विकासासाठी मी या संघटनेशी जुळलो तुकडोजी महाराज म्हणतात "जब किसानोकी देखु भलाई मैने खुशिया ही खुशीया मनाई" म्हणून मी माझ्या विधानसभा मतदार संघा मध्ये मायबाप शेतकरी शेतमजूर यांच्या भलाई साठी मी पाठींबा दिला मला सार्थ विश्वास आहे के. चंद्रशेखर राव यांच्या विकासनितीच्या माध्यमातुन महाराष्ट्र विकसित व विकसनशील होईल तेलंगणा व्हिजन हे महाराष्ट्रातील जनतेच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे व येत्या काळात विधानसभा निवडणुकीत आपल्या तेलंगणा विकास व्हिजनला सुद्धा उस्फुर्त प्रतिसाद मिळेल असे वक्तव्य करून मुख्यमंत्री निवासस्थानी बैठक पार पडली .
निरंजन भाऊ पाटील,राजूभाऊ तेलखडे,रामचंद्र बारंगे,दर्पण दादा टोकसे,रोशणभाऊ काकपुरे,सचिन बोडखे,माही धांदे,मनीष दाभने,नौशादसौदागर,गोपाल गिऱ्हाळे,यादवराव भांगे,शेषरावजी पठाडे,यादवराव खवशी,प्रशांत जवंजाळ उपस्थीत होते. असे वृत्त महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेला प्राप्त झाले असल्याचे संजय कडोळे यांनी कळवीले आहे.