अकोला (वाशिम जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) शासनाकडून,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रलंबित असलेल्या सर्वच मागण्या,आश्वासित प्रगती योजने अंतर्गत कालबद्ध पदोन्नतीच्या 10- 20 -30 वार्षिक वेतन वाढीच्या मागण्या करीता, विधानपरिषदेत आवाज बुलंद करणारे, अमरावती विधान परिषदेचे सदस्य असलेले एकमेव शिक्षक आमदार अँड किरणराव सरनाईक यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सर्व समस्या सोडविण्याचा विडा उचलला असून त्याकरीता, अकोला जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी,त्यांनी स्थळ : सिताबाई आर्टस महाविद्यालय सभागृह अकोला येथे स्वतःहून,शुक्रवार दि. 25 ऑगष्ट रोजी दुपारी ठिक 01:00 वाजता,शिक्षणाधिकारी (माध्यमिक),अधिक्षक वेतनपथक,लेखाधिकारी आणि संबधित अधिकारी यांची महत्वपूर्ण बैठक बोलवीली आहे. तरी संबधित सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी यांनी, कार्यालयीन स्तरावर प्रलंबित असणाऱ्या,आपापल्या समस्या, लेखी निवेदनासह सोबत घेऊन बैठकीला उपस्थित रहावे असे आवाहन अकोला येथील गजानन हरणे यांनी केले आहे.