अकोला- अमर जवान माजी सैनिक संघटना अकोला जिल्ह्याच्या वतीने कारगिल विजय दिवस विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधून दरवर्षी विविध उपक्रम राबविल्या जातात. यावर्षी शहीद प्रविण प्रभाकर जंजाळ यांच्या स्मृती प्रित्यर्थ अमर जवान माजी सैनिक संघटनेच्या वतीने 24 वृक्ष लावून हा दिवस साजरा करण्यात आला. या वृक्षांच्या संवर्धनाची जबाबदारी सुद्धा संघटनेने घेतली. त्यापैकी वनमित्र प्रमोद सिंधुताई इंगळे यांनी 11 वृक्ष लावून संवर्धनाची जबाबदारी घेतली.
अकोला जिल्ह्यामध्ये पर्यावरणाचा समतोल राहावा म्हणून संघटना माजी सैनिक सुभाषराव म्हैसने पाटील यांच्या मार्गदर्शनात अकोला जिल्ह्यामध्ये शहीदांच्या स्मृतीप्रित्यर्थ वृक्ष लावून संवर्धनाची जबाबदारी घेते. शुक्रवारी (दि. 26) सकाळी कारगिल युद्धामधील शहीदांना श्रद्धांजली वाहून विरपिता वामन गवई, विरमाता सौ. मायावती गवई त्यानंतर सेना मेडल प्राप्त माजी सैनिक संतोष समुद्रे व कारगिल युद्धामध्ये सहभागी माजी सैनिक गंगाधर दांदळे व युद्धात सहभागी माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. वृक्ष लागवडीसाठी ग्रीन बिग्रेडचे अध्यक्ष विवेक पारसकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
साथ रोगाची लागन लक्षात घेता भव्य रोग निदान शिबीर घेण्यात आले. त्याला गुड मॉर्निग पथकाचे अध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे यांचे सहकार्य लाभले. एकून 239 रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधी वाटप करण्यात आले. शिबिराची संपुर्ण जबाबदारी अमर जवान माजी सैनिक संघटनेचे उपाध्यक्ष माजीसैनिक सुरेश वढे यांनी सांभाळली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन संघटनेचे अध्यक्ष माजी सैनिक सुभाषराव म्हैसने यांनी केले. तर आभार प्रदर्शन संघटनेचे सचिव रामरतन बुळूकले यांनी केले. कार्यक्रमाला माजी सैनिक संघटनेचे विभागीय अध्यक्ष संतोष कुटे, सामाजिक कार्यकर्ते गोपाल मेहरे, डॉ. अशोक ओळंबे, माजी सैनिक निवृत्ती मानकर, शांताराम काळे, शंकर लासूरकर, अशोक बनसोड, भगवान खडारे, वसंता खेडकर, संदीप मगर, गजानन ढोकणे, मुरलीधर झटाले, अंबादास वानखडे, रिटायर्ड पीएसआय प्रभाकर मोगरे, मनोहर रोठे, अशोक भिलकर, चंद्रकांत ताठे, सेलसींग सिसोदिया, राजेंद्र तेलगोटे, ज्ञानदेव बदरखे, संतोष जाधव, आकाश करागळे, सागर भानकुळे, प्रज्वल जाधव, गजानन गोलाईत, श्रीकृष्ण तायडे, शंकर इंगळे, रमेश शेरेकर, प्रमोद बनसोडे, भागवत गिरी, विट्टल चिकटे, धनराज सदाशिव, रमेश इंगळे, सावरकर, गंगाराम साबे, नेमाडे मॅडम व बरेच नागरिक उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....