वाशीम : नुकताच पाकिस्तानचा वरदहस्त असलेल्या पाकिस्तानी आतंकवाद्यांनी, काश्मिर येथील पहलगाम येथे भारतिय पर्यटकांसह नेपाळी पर्यटकांवर हल्ला केला.त्यामध्ये पाकिस्तानशी काही घेणेदेणे नसलेल्या निष्पाप लोकांना जीवाला मुकावे लागले. पर्यटनासाठी आनंद लुटायला जाणाऱ्यांच्या अख्ख्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यामुळे संपूर्ण भारता मधून तिव्र निषेध करण्यात येत असून घटनेचा बदला घेण्याचे साकडे भारत सरकारला घालण्यात आले होते.अखेर या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या तिनही सैन्यदलांना योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्या अनुषंगाने वायुसेनेने दि. o७ मे २०२५ च्या पहिल्या रात्र प्रहरात गंभीर कार्यवाही करीत पाकिस्तान मधील नऊ ठिकाणच्या आतंकवादी मुख्यालय आणि दहशतवादी प्रशिक्षण केन्द्रे व तळांवर हमला करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर मोहीम राबवून पाकिस्तानची आतंकी तळे उध्वस्त करून आतंकवाद्यांना गाढ झोपेतच कंठस्नान घातले. केवळ २५ मिनिटाच्या कार्यवाहीत भारतीय सिमेतूनच राफेल विमानाद्वारे मानव विरहित ड्रोन द्वारे क्षेपणास्त्र डागण्यात भारतिय सेना यशस्वी ठरली.सकाळी साखर झोपेतच ही वार्ता मिळाल्याने पहलगामच्या घटनेत आपलं कुंकू आणि सिंदूर गमविलेल्या नारीशक्तीला निश्चितच समाधान वाटले , भारतिय सैन्याने पंधरा दिवसाच्या आत केलेल्या जवाबी कार्यवाही मुळे अख्खा भारतदेश त्यांचे कौतुक करीत असून "भारत माता की जय" ची गर्जना करीत आहे. . देशात सर्वत्र मॉकड्रिम आणि युद्धाचा सायरन वाजत असल्याने युद्धाचे वारे वाहत आहेत.शिवाय ऑपरेशन सिंदुर मुळे प्रचंड प्रमाणात हादरलेला पाकिस्तान आपल्या कुरापती वाढविण्याची शक्यता असल्याने, अनेक वर्षापासूनची खुमखुमी बाहेर पडण्याची शक्यता सुद्धा आहे. त्यामुळे आता भारतिय नागरिकांची सर्व भिस्त भारतिय सैनिकांवर असून,भारतिय नागरिकांचे सर्वेतोपरी लक्ष्य भारत पाकिस्तान युद्धाकडे लागले आहे.दूरचित्रवाणी वाहिन्या, वेगवेगळी टि व्ही इलेक्ट्रॉनिक्स मिडीया आणि विश्वासार्ह वृत्तपत्रे यांचही लक्ष्य युद्धाकडे लागलं आहे.