वरोरा:-
पोलिस स्टेशन, शेगाव (बू )पैगामे रजा सेवा संस्था, यांचे संयुक्त विद्यमाने
नेहरू शाळा शेगाव (बू) येथे दिनाक 26सप्टेबर रोजी सकाळी 9.00 वा ते दोन वाजेपर्यंत हजरत पैगंबर साहेब यांचे जयंती निमित्त भव्य रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन वरोरा भद्रावती विधानसभा चे आमदार मा. प्रतिभा ताई धानोरकर आणि ठाणेदार अविनाश मेश्राम पोलिस स्टेशन शेगाव बू यांनी केले. ठाणेदार मेश्राम यांनी जयंती लोकभिमुख कार्यक्रम घेऊन साजरी करण्यात येत असल्याने ती खऱ्या अर्थाने जयंती साजरी होत आहे असे म्हणाले, तसेच सर्व मुस्लिम बांधवांना हजरत मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या जयंती च्या शुभेच्या देण्यात आल्या. दोन दिवसावर आलेल्या गणपती उत्सव सुध्दा असेच कार्यक्रम घेऊन साजरी करावे असे आवाहन केले. आरोग्य हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. प्रत्येकाला निरोगी जीवन जगता यावे यासाठी प्रयत्न करायला हवे. शिबिराचा उद्देश जनतेला निरोगी ठेवण्याचा आहे. नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आव्हान केले. रीबिन कापून रीतसर सर्वरोग निदान व उपचार शिबिर चे उद्घाटन केले.
या शिबिर करीता आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी मेघे. येथील डॉक्टरांची टीम बोलवण्यात आली होती. यामध्ये मेडीसिन तज्ञ, नेत्ररोग , सर्जरी, बालरोग, स्त्रीरोग, अस्थिरोग, स्वशन रोग, दंत व मुख रोग , त्वचा रोग तज्ञ डॉ यांनी तपासणी केली. या शिबिराचा 560 लोकांनी लाभ घेतला.
कार्यक्रम करीता नेहरू शाळेचे मुख्यध्यापक ढाकुनकर सुर, शेगाव बू माजी सरपंच यशवंत लोडे, तंटामुक्ती अध्यक्ष गजानन ठाकरे, शांतता समिती शेगाव बू चे उमेश माकोडे हजर होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पठाण यांनी केले तर आभार मुज्जू शेख यांनी मानले.
आरोग्य शिबीर यशस्वी होण्यासाठी करीता पैगामे रजा सेवा संस्था चे सर्व सदस्य आणि पोलिस स्टेशन शेगाव बू चे सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्ग यांनी प्रयत्न केले.
मोहसिन सय्यद वरोरा
आपल्या प्रतिक्रिया द्या....