आरमोरी :-
तालुक्यातील कासवी येथे नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा २ अंतर्गत महिला शेतकरी यांची भात पिकांवर ४ थी शेतीशाळा तालुका कृषि अधिकारी निलेश गेडाम व मंडळ कृषि अधिकारी संदीप नाकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर शेतीशाळा कासवीच्या सहाय्यक कृषि अधिकारी स्मिता शंभरकर यांच्या प्रत्यक्ष थेट बांधावर महिला शेतीशाळा घेत आहेत
महिला शेतीशाळा म्हणजे कृषि विभागातर्फे महिला शेतकऱ्यांसाठी आयोजित केलेले प्रात्यक्षिक प्रशिक्षण वर्ग आहेत यामध्ये कासवी येथील महिला शेतकरी गायत्री दिपक दुपारे यांच्या शेतावर गावातील महिला शेतकरी, बचत गटाच्या महिला एकत्र येऊन पिकांच्या पेरणीपासून ते काढणीपर्यंत सर्व आधुनिक तंत्रज्ञान व व्यवस्थापन शेतीशाळेत महिला शिकत असतात.
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा २ अंतर्गत एकूण सहा शेतीशाळा घेतल्या जातात
जमिनीच्या आरोग्य पत्रिका,खत व्यवस्थापन, एकात्मिक कीड व्यवस्थापन, आणि नैसर्गिक कीटकनाशके तयार करणे, फवारणी करताना घ्यावयाची काळजी यासारख्या विषयांवर प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन ज्यामुळे महिला शेतकरी शेतीत अधिक सक्षम बनतात
महिला शेतकरी यांची शेतीशाळा घेत असुन यामध्ये अतिशय योग्य आणि शाश्वत शेतीसाठी भात पिकांवर अनेक प्रकारचे रोग,किड नुकसान करीत आहे त्यासाठी जैविक सेंद्रिय शेती हा शेतकऱ्यांसाठी आरोग्यदायी असल्याचे उपकृषि अधिकारी प्रिया आखाडे सहाय्यक कृषि अधिकारी स्मिता शंभरकर महिला शेतीशाळेला वर्गात मार्गदर्शन करतात.
आजच्या युगात पुरूषांच्या बरोबरीने महिलाही शेती करतात त्यासाठी त्यांना खरंच महिला शेतीशाळा गरजेचे आहे.
आधुनिक तंत्रज्ञान वापर : महिला शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान व सुधारित शेती पद्धतींची माहिती देऊन त्यांना सक्षम बनवणे हे महिला शेतीशाळांचे मुख्य उद्दिष्ट आहे.
प्रात्यक्षिकांवर भर: प्रत्यक्ष शेतावर प्रात्यक्षिके घेऊन शिकवले जात असल्याने, महिला शेतकऱ्यांना नवीन गोष्टी सहजपणे शिकता येतात आणि त्या प्रत्यक्षात आणता येतात.
शासकीय योजनांची माहिती: महिला शेतीशाळांमध्ये महिला शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन त्यांचा फायदा मिळवून देण्यास मदत होते. रासायनिक फवारणीचा कमी वापर: पर्यावरणपूरक पद्धती वापरून निंबोळी अर्क व दशपर्णी अर्क यांसारखी घरगुती सेंद्रिय कीटकनाशके कशी तयार करायची हे शिकवले जाते, ज्यामुळे रासायनिक फवारणीचा वापर कमी होतो.
पीक व्यवस्थापनात सुधारणा: जमिनीचे आरोग्य पत्रिका वाचून त्यानुसार खत व्यवस्थापन करणे आणि पिकांवरील किड रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन करणे या महत्त्वाच्या बाबी शिकवल्या जातात.
शेतीशाळेत काय शिकवले जाते?
जमिनीची आरोग्य पत्रिका तपासणे आणि त्यानुसार खत व्यवस्थापन करणे.
पिकांवरील प्रमुख किड रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन शिकणे.
निंबोळी अर्क आणि दशपर्णी अर्क यांसारखी सेंद्रिय कीटकनाशके तयार करण्याची प्रात्यक्षिके.
पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान अंतर्गत दशपर्णी अर्क तयार करण्याचे प्रात्यक्षिक.
पिकविम्याचे महत्त्व पटवून देणे आणि पिकविमा काढण्यासाठी आवाहन करणे.
थोडक्यात, महिला शेतीशाळा हे कृषी विभागाच्या पुढाकारातून महिला शेतकऱ्यांना शेतीत स्वावलंबी व सक्षम बनवण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे.
वातावरणानुसार येणाऱ्या सप्टेंबरचा शेवटचा पंधरवडा ते आक्टोबरचा पहिला पंधरवडा या दरम्यान येणारा तुडतुडा या कीडीबाबत सतर्कता बाळागून शेतकऱ्यांनी तालुका कृषि कार्यालयाशी संपर्क करावा असे आवाहन निलेश गेडाम यांनी केले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....