मेंडकी (ब्रम्हपुरी):- विर शिवाजी युवा मित्र मंडळ मेंडकी च्या वतीने नुकतेच मेंडकी ग्रामपंचायतच्या सभागृहा मध्ये संपन्न झाला . शिबीराचे उद्घाटण सुधाकरजी महाडोरे यांनी केले तर अध्यक्ष स्थाणी प्रा. प्रशांत दोनाडकर होते . प्रमुख अतिथी म्हणून ग्रा. प. सदस्य चिंतामण जेल्लेवार तथा हेमराज बावणे , शरद दुमाणे, आकाश लोणारे , निरंजण ढवळे व आदी मान्यवर उपस्थित होते . रक्तदान शिबीरामध्ये रक्त संकलण करण्यास जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली तसेच स्वयं रक्तदाता समीती चे अध्यक्ष चारुदत्त राऊत , डॉ गिरीपुंजे, निलेश सोनवाने, आकाश आंबोरकर, राहुल वाळके, बंडु कुंभारे, प्रमोद देशमुख यांचे विशेष सहकार्य लाभले. मेंडकी तसेच परिसरातील बारा युवकानीं रक्तदान केले. रक्तदाण शिबीर यशस्वी करण्या साठी भुषण आंबोरकर, प्रशांत खोब्रागडे, गौरव ठोंबरे, जतीण निकोडे, ओमप्रकाश जेंगठे, खेमचंद वसाके, प्रमोद आंबोरकर, श्रीकृष्ठ आंबोरकर प्रणय गुरनुले यांनी अथक परिश्रम घेतले