कारंजा शहरात पंचक्रोशीत आज गुरुवार दि. 20/07/23 रोजी सकाळी थोडाफार पाऊस पडला असून, ढगांच्या गडगडात दुपारी 04:00 पासून रिमझिम पाऊस सुरू झालेला आहे.आज संध्याकाळी रात्री रात्रभर पाऊस पडण्याचा अंदाज असून,महाराष्ट्रात व वाशिम जिल्हयात कोठेतरी वीज पडणार असा अंदाज आहे. दिनांक 21/07/23 सकाळी दुपारी रात्री पाऊस पडणार. भाग बदलून जिल्हयात पाऊस पडणार.वीज पडणार असा अंदाज आत्ताच हाती आलेल्या वृत्तानुसार,वाशिम जिल्ह्यातील, मानोरा तालुक्यातील ग्राम रुईगोस्ता येथील हवामान तज्ञ गोपाल गावंडे
यांनी महाराष्ट्र राज्यस्तरीय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी कळविले असून,त्या पाश्वभूमिवर शेतात कुणीही थांबू नये.गुराखी मेंढपाळ,शेतकरी,शेतमजूर यांनी सतर्क राहून लवकर घरी परतावे. झाडाखाली चुकूनही थांबू नका. विजा कडाडत असतांना घरातील टि व्ही (दूरदर्शन ) व मोबाईचे नेट बंद करा.गावाबाहेरून जंगलात / शेतातून प्रवास करू नका. नदी नाल्याच्या प्रवाहात जनावरे, वाहने (दुचाकी / चारचाकी बस ) टाकू नका.असा सावधगीरीचा इशारा महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेकडून देण्यात येत असल्याचे संजय कडोळे यांनी कळविले आहे.