कारंजा :- कारंजा येथून जवळच असलेल्या पोहा येथे सुप्रसिद्ध तीर्थस्थळ असलेल्या दुर्गादेवी संस्थान इथे स्व.सुरज चौधरी स्मृतीप्रित्यर्थ स्थानिक युवकांनी रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन केले.शिबीर स्थळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष तथा नगराध्यक्ष न. प. मानोरा श्री.हेमेंद्रभाऊ ठाकरे यांनी भेट दिली व आपल्या वक्तव्यातून युवकांच्या आयोजित रक्तदान शिबिराचे कौतुक केले व आयोजकांना असेच कार्यक्रम भविष्यात सुद्धा आयोजित करण्यास शुभेच्छा देऊन त्यांचे मनोबल वाढवले.आणि आयोजकांनी वेळोवेळी समाजाच्या हिताचे कोणतेही कार्यक्रम राबवत राहावे व त्यावेळी कोणतीही अडचण आल्यास हक्काने सांगावे असे आव्हान केले..
सदर कार्यक्रमांस प्रहारच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हजेरी लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि कार्यक्रमात केवळ हजेरी न लावता श्री.हेमेंद्र ठाकरे यांनी स्वतः पुढाकार घेऊन रक्तदान सुद्धा केले.तसेच श्री अनुप ठाकरे , दिपक पाटील, सर्वेश पाटील व इतर पदाधिकारी यांनी सुद्धा रक्तदान करून कार्यक्रमातआपला सक्रिय सहभाग नोंदवला.
ग्राम पोहा येथील माजी सरपंच डॉ.शरदराव दहातोंडे,संतोष कांबळे,ज्ञानेश्वर खाडे,माजी सैनिक प्रदिप राऊत, प्रहार युवा जिल्हाध्यक्ष अमोल घुले पाटील, पुंडलिक लसनकुटे, ॲड.श्रीकांत चौधरी,संतोष पवार,शिवाजी ठाकरे, सतिश शिंदे व शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजनक नवयुवक मित्र मंडळ पोहा व समस्त मित्र परिवार पोहा यांनी केले.