वरोरा :- वरोरा तालुक्यातील चिकणी या गावात पोलिसांच्या माहितीनुसार पस्तीस वर्षापासून अवैध दारू विक्रीचे धंदे ,जुगार चालू असून या विरोधात असंख्य महिलांनी दारू विक्रेत्यांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून काल दिनांक २५ सप्टेंबर रोज सोमवारला महिलांनी सकाळच्या सुमारास अवैध दारू घेऊन येणाऱ्या दारू विक्रेत्यास पकडण्यासाठी गेले असता अवैध दारू विक्रेत्यांनी चुंबळी (कापडी पिशवी)टाकून पळून गेला.महिलांनी 112 या दूरध्वनी क्रमांकावर फोन करून सदरची माहिती दिली. वरोरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्या पिशवीत 28 टील्लू (९०ml) देशी ,एक विदेशी नीप आढळून आली.
चंद्रपूर जिल्ह्यात मुबलक प्रमाणात कोळसा, चुनखडी, विद्युत निर्मिती केंद्र यांचे साठे असल्याने यामध्ये बाहेर राज्यातील शेकडो मजूर या ठिकाणी येतात , जागेवरच जवळपास श्रम परिहारसाठी अनेक अवैध दारू विक्रेते निर्माण झालेले आहे. चिकणी या गावातही जवळपास सात ते आठ अवैध दारू विक्रेते आहे, आता या अवैध दारूचे व्यसनही लहान मुले, विद्यार्थ्यांना लागत असल्याने महिलांनी दिनांक ६ सप्टेंबर रोज बुधवार राज्य उत्पादन शुल्क, वरोरा. तसेच पोलीस स्टेशन, वरोरा. येथे तक्रार अर्ज दाखल केले परंतु अवैध्य दारू विक्रेत्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्याने दिनांक 13 सप्टेंबर रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे कार्यालय गाठून मंदाबाई मारुती दातारकर, संगीता मारुती मेश्राम ,प्रीती संदीप फुलकर, मंजुषा राजू वानखडे, गौसिया कादर पठाण ,रा. सर्व चिकणी यांनी तक्रार अर्ज दाखल केला,मात्र वीस दिवसाचा कालावधी लोटून गेल्यानंतरही महिला नेहमीप्रमाणे सकाळच्या सुमारास शेतीकामासाठी जेवणाचा डबा ,विळे घेऊन कामावर निघाल्या या संधीचा फायदा घेत अवैध दारू विक्रेता गावात दारू घेऊन आला मात्र महिला या शेतातील कामावर न जाता अनेक ठिकाणी लपून बसून कानोसा घेत होत्या, अवैध्य दारू विक्रेता यांचा अंदाज चुकला आणि महिलांनी आपल्याला दारूसकट घेरल्याचे समजतात अवैध दारूची पिशवी सोडून मिळेल त्या वाटेने धूम ठोकली. अपयशी ठरलेले पोलीस अधिकारी आणि यशस्वी ठरलेल्या महिला यांनी 112 या दूरध्वनी क्रमांकावर फोन केला काही वेळातच पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले, पकडलेल्या दारू बाबत विचारणा केली. अवैध दारु आम्हास द्या! आम्ही कारवाई करू असे म्हटल्यावर महिला संतप्त झाल्या जोपर्यंत दारू विक्रेत्याला पकडणार नाही तोपर्यंत अवैध दारू आम्ही तुमच्या स्वाधीन करणार नाही? असे म्हटले शेवटी पोलीस कर्मचाऱ्यांनी अवैध दारू विक्रेत्यास पकडल्यावर महिलांनी ती अवैध दारू पोलिसांच्या स्वाधीन केली. एवढेच नव्हे तर अंदाजे 70 ते 80 महिला पोलिसांच्या गाडीच्या मागोमाग पोलीस स्टेशन येथे आले, पोलिसांनी आरोपीवर कारवाई करीत महिलांनी कायदा हातात घेऊ नये! अशी समजही दिली, पोलिसांना याची माहिती द्या पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल होतील असेही सांगण्यात आले, वीस दिवसाआधी पासून पोलिसांना याची माहिती देऊनही आरोपीवर कारवाई न करणाऱ्या पोलिसांची ही समज आहे की तंबी तर नाही समजावी ना ?असा प्रश्नही आता उपस्थित झाला आहे.
चौकट:-
दिनांक 25 सप्टेंबर रोजी संगीता मनोज मेश्राम रा. चिकणी या महिलेने सकाळी आठ वाजताच्या दरम्यान आमच्या गावातील इतर महिला शेतामधे निंदन करण्यासाठी जात असताना किसान कवडू कार्लेकर तसेच इंदिरा कवडू कार्लेकर रा. चिकणी हे दोघेही गावांमध्ये दारू विक्रीचा धंदा करीत असून गावातील दारूबंदी समिती अध्यक्ष प्रीती संदीप फुलकर व सदस्य यांनी दारू विक्री बंद करण्याबाबत सांगितले असता ते दोघेही मायलेकानी अश्लील शिवीगाळ करीत, जातीवाचक शिवीगाळ केली एवढेच नव्हे तर तुम्हाला खोट्या गुन्ह्यात फसवून टाकीन अशी धमकीही दिल्याने महिला भयभीत झाल्या असून पोलीस अधिकारी यावर काय कारवाई करतात? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे या तक्रारीत सतरा महिलांनी स्वाक्षरी केलेले पत्र दिलेले आहे.