मूल : तालुक्यातील चितेगाव येथे 25 जानेवारीला राज्य उत्पादन शुल्क विभागाने बनावट दारू निर्मिती कारखान्यावर धाड मारली होती. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या आदेशाने सदर गुन्ह्यातील पसार आरोपी यांना तात्काळ अटक करून सखोल चौकशीचे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिले होते. याबाबत सखोल तपास करीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने तपास करीत पसार आरोपी पवन उर्फ गोलू वर्मा यांच्याशी संपर्कात असलेल्या आरोपींचा शोध लावत त्यांना अटक केली. तयार माल वितरक 41 वर्षीय उमाजी चंद्रकांत झोडे रा. मिणघरी, सिंदेवाही, बनावट दारू निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल पुरवठादार 46 वर्षीय पोलीस पाटील गुरुदास खुशाबराव संग्रामे ब्रह्मपुरी या दोघांना सिंदेवाही बस स्थानकाजवळ अटक करण्यात आली.दोन्ही आरोपिकडून बनावट दारू निर्मितीसाठी लागणाऱ्या साहित्याची वाहतूक करणारा आयशर टेम्पो वाहन क्रमांक MH40 BL1875 व दारूची तस्करी करणारे वाहन चारचाकी वाहन MH34P5890 असा एकूण 19 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आतापर्यंत या गुन्ह्यात एकूण 36 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.दोन्ही आरोपींना आज मूल न्यायालयात हजर केले असता दोन्ही आरोपींची 3 दिवसाची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे.
या गुन्ह्यातील मुख्य आरोपी अद्याप फरार आहे, गुन्ह्याचा पुढील तपास चंद्रपूर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक संदीप राऊत मूल तालुका हे करीत आहे.