कार्यक्रमाचे संचालन वर्ग ९ वी च्या संचिता जाधव व जानवी देवकर यांनी केले.
याप्रसंगी शाळेचे सर्वेसर्वा मा. श्री मंगेशजी वानखडे सर व सौ. सुवर्णा वानखडे मॅडम यांनी अध्यक्ष स्थान ग्रहण केले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यात आले त्यानंतर फंदाट मॅडम, खोत मॅडम, देशमुख मॅडम व नांदुरकर सर यांनी प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा वर्ग ९ वी च्या विद्यार्थ्यांनी गुलाब पुष्प व भेटवस्तू देऊन सत्कार केला.
शाळेतील अबॅकस क्लास च्या वतीने अबॅकस च्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मेडल व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आले. शाळेच्या शिक्षिका सौ. उगले मॅडम यांनी चक्रधर स्वामी जयंती निमित्य चक्रधर स्वामी विषयी माहिती दिली तर सौ. कुलकर्णी मॅडम यांनी शिक्षक दिनानिमित्त डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
शाळेचे सर्वेसर्वा मा. श्री मंगेशजी वानखडे सर यांनी अध्यक्षीय भाषण केले त्यात त्यांनी आपला पहिला गुरु म्हणजे आपली आई आणि आपल्यावर जी संस्कार करते त्या आईचे ऋण आपण फेडू शकत नाही असे प्रतिपादन केले. आईचे बालवयापासून आपल्याला शिकवते आपल्यावर चांगल्या गोष्टींचे संस्कार देते आपल्या सोबत मित्रवत राहते त्या आईला आपण आपल्या गुरूंचा दर्जा दिला पाहिजे. गुरु आपल्याला योग्य मार्गदर्शन देतात. असे सांगितले.
शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिका सादर केल्या व स्वयंम शासनाचा कार्यक्रम घेतला गेला. अनेक विद्यार्थ्यांनी भाषणे दिली व आभार प्रदर्शन गौरी तांबट हिने केले. शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.