स्मारक मंडळ आरमोरीच्या वतीने आरमोरी नगरातील तथागत बुद्ध विहार येथे देवनामपिय प्रियदर्शी चक्रवती राजा सम्राट अशोक यांची जयंती उत्साहात संपन्न झाली. याप्रसंगी चक्रवती राजा सम्राट अशोक यांच्या कारकिर्दीत निर्मित विविध शिलालेख, स्तंभलेख, गुहालेख, त्यांच्या अनेक पैलू वर तसेच त्यांनी केलेल्या विशेष कार्याचा उल्लेख करून बुद्ध धम्माच्या प्रचार-प्रसारासाठी त्यांचे योगदान प्रतिपादित केले. याप्रसंगी बुद्धाच्या शिकवणीतून राष्ट्र उभारणी करणारा महान सम्राट 'अशोक' इतिहासात अजरामर झाल्याचे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक मंडळाच्या सनियंत्रण समितीचे प्रमुख खिरेंद्र बांबोळे यांनी केले. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक मंडळाचे अध्यक्ष मा. मदन मेश्राम अभिवादन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांनी सम्राट अशोक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचे प्रमुख डॉ. नीलकंठ मसराम, प्राचार्य प्रकाश पंधरे, सामाजिक कार्यकर्ते जयकुमार मेश्राम, हरिदास सहारे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक मंडळाचे सल्लागार समिती प्रमुख विजय ठवरे उपस्थित होते. प्रियदर्शी सम्राट अशोक अभिवादन कार्यक्रमाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक मंडळाचे कोषाध्यक्ष कल्पनाताई ठवरे, कार्यकारणी सदस्य कलीराम गायकवाड, ऋषीजी रामटेके, अंबरदास फुलझले, राजू रामटेके, पौर्णिमा बारसागडे तसेच सम्राट अशोक सोशल फोरमचे डॉ. प्रदीप खोब्रागडे, अनिल ठवरे,प्रभाकर गजभिये, दीपक गणवीर,अरविंद मेश्राम,विनोद भांबोरे, चेतन निमगडे, अशोक मेश्राम, वर्षा खोब्रागडे इत्यादी उपस्थित होते. अभिवादन कार्यक्रमाचे संचालन डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक मंडळाचे सचिव जयकुमार शेंडे यांनी तर आभार प्रदर्शन भगवान बनसोड यांनी केले. देवनामपिय प्रियदर्शी सम्राट अशोक अभिवादन कार्यक्रमाला बौद्धउपासक, उपासिका तथा नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.