अकोला..
वारकरीरत्न श्रीसंत वासुदेव महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे श्रीक्षेत्र श्रद्धासागर अकोट येथून प्रस्थान झाले असून. पंढरपूर येथे दिनांक २ जुलैला संध्याकाळी पोचणार आहे. ६५० किलोमीटरचा प्रवास वारकरी पैदल वारी द्वारे करणार आहे. या पालखी सोहळ्यात तीनशे सहभागी सर्व वारकऱ्यांचा विमा श्रीसंत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेच्या वतीने काढला आहे. पायदळ वारी करणारी ही एकमेव वारी महाराष्ट्रातील अशी वारी आहे की या वारीमध्ये सहभागी असलेल्या वारकऱ्यांचा विमा काढला जातो तोही भक्ता जवळून एक रुपया न घेता . तसेच वारीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यां जवळून सुद्धा कोणत्याही प्रकारची नोंदणी फि न घेणारी एकमेव संस्था आहे . उलट वारकऱ्यांना कपडे , रेनकोट ,बॅगा आदी जीवनावश्यक वस्तूचे मोफत वाटप करण्यात आले .हे या पालखी दिंडीचे वैशिष्ट्य आहे. तसेच सोबत पाण्याच्या टँकरची व्यवस्था, पिण्याच्या पाण्या करता शुद्ध अशा आरो च्या पाण्याची व्यवस्था संपूर्ण वारीमध्ये सुरुवात पासून तर शेवटपर्यंत पंढरपूर पर्यंत करण्यात आली आहे. तसेच वारकऱ्यांच्या पायदळ वारी सोबत औषद्या सह सुसज्ज ॲम्बुलन्सची व्यवस्था सुद्धा संपूर्ण वारीमध्ये करण्यात आली आहे तसेच सुमिरन फाउंडेशन अकोला च्या अध्यक्ष पूजा खेतान यांच्या टीमच्या वतीने वारकऱ्यांसाठी औषधांची किट मोफत देऊन पालखीला सहकार्य केले आहे.अशा या प्रसिद्ध व मानाच्या पालखीचे श्री राज राजेश्वरनगरी अकोल्यामध्ये दिनांक 9 जूनला संध्याकाळी ६ ला आगमन झाले आहे . त्याआधी या वारीच्या अकोला शहरांमध्ये शिस्तबद्ध स्वागत व्हावं म्हणून सिंधी कॅम्प येथे नुकतीच नियोजन बैठक घेऊन त्याचे नियोजन करण्यात आलेला आहे त्यानुसार वासुदेव महाराजांच्या पालखी सोहळ्याचे शहरात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले असून, श्रीच्या पालखी मार्गावर महिलांनी रांगोळ्या काढून पृष्पवृष्टी करण्यात आली आहे.सदगुरु श्री संत वासुदेव महाराज यांनी आजीवन पंढरीची वारी अखंड केली. श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था, आकोटद्वारा श्री संत वासुदेव महाराज यांचा पायदळ पालखी सोहळा अव्याहतपणे श्रीक्षेत्र पंढरपूर वारीकर्ता निघत असतो. हे पालखी सोहळ्याचे सोळावे वर्ष आहे. पालखी सोहळ्यामध्ये पताकाधारी, अब्दागिरी, टाळकरी, वारकरी, मृदंगाचार्य, गायनाचार्य, विणेकरी यांसह 300 च्या वर महिला-पुरुष सहभागी झाले आहेत. अकोला महानगर शहराच्या प्रमुख मार्गाने श्रीची पालखी सोहळ्याचे जागोजागी पूजन व स्वागत करण्यात आले आहे
विदर्भ माऊली श्री संत वासुदेव महाराज पालखी सोहळ्याचे अकोला शहरात ९ तारखेला आगमन झाले असून राज राजेश्वर नगरी अकोला सायंकाळी सहा वाजता खंडेलवाल धर्मशाळा रेल्वे स्टेशन चौक येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पालखी सोहळ्याचे पूजन व स्वागत राजू पूडकर परिवाराच्यावतीने करण्यात आले. त्यानंतर हा पालखी सोहळा दत्त मंदिर,तापडिया नगर मार्गे माजी आमदार वसंतराव खोटरे यांच्या निवासस्थानासमोर सातव चौक येथून कोल्हटकर मंगल कार्यालय येथे रात्रीचे किर्तन महाप्रसाद व मुक्काम गोपाळराव दोड व परिवारातर्फे आयोजित करण्यात आले होते . दिनांक 10 ला सकाळी पालखी सोहळा गुप्ते मार्ग,वामनराव पुंडकर व परिवार स्टेट बँक लहान उमरी मार्गे लोखंडे ले आऊट, संतोष सावरकर गजानन महाराज मंदिर मार्गे मोठी उमरी, विठ्ठल मंदिर येथे दुपारचा विसावा व भोजन व्यवस्था चांगल्या पद्धतीने पार पडली. पालखी सोहळा दुपारी राऊतवाडी,जठारपेठ चौक मार्गे रतनलाल प्लॉट, सिव्हिल लाईन चौक शास्त्रीनगर, राम मंदिर मार्गे विद्याविहार होस्टेल समोरून दूध डेरी रोडने जवाहर नगर चौक मुकुंद नगर गजानन महाराज मंदिर येथे रात्रीचा मुक्काम किर्तन भजन महाप्रसाद संपन्न झाला.
पालखी सोहळा सकाळी 11 ला गजानन पेठ मार्गे प्रा. गोपाल झांबरे, हनुमान मंदिर, हनुमान नगर मार्गे जयदीप सोनखासकर व मित्रपरिवार, टेलिफोन कॉलनी, चतुर्भुज कॉलनी, राम मंदिर मार्गे संताजीनगर, रवीनगर मार्गे गोयणका लेआउट मधून द्वारका नगरी राजेंद्र मोहोकार यांच्याकडून पवित्रकार परिवार यांच्याकडे दुपारचे प्रवचन भोजन व विसावा राहीला
दुपारी पालखी सोहळा आरसीसी क्लास समोरून, गोरक्षण रोड मार्गे सहकार नगर पंकज जायले व परिवार गजानन महाराज मंदिर समोरून संत तुकाराम महाराज चौक,कोठारी वाटिका, हनुमान मंदिर येथे श्रीधरराव टीकार यांच्याकडे रात्रीचे किर्तन महाप्रसाद मुक्काम राहिला.
पालखी सोहळा 12 तारखेला सकाळी रिंगरोड,दत्त मंदिर मित्र परिवारातर्फे फराळ व तेथून कोलखेड चौक मार्गे सिंधी कॅम्प,पाटील दूध डेअरी येथे हभप.वासुदेवराव महल्ले यांच्याकडे दुपारचा किर्तन व विसावा व भोजन व्यवस्था करण्यात आली होती
त्यानंतर पालखी सोहळा पोलीस अधीक्षक कार्यालय समोरून अशोक वाटिका मार्गे बस स्टॅन्ड समोर निशांत टावर येथे स्वागत स्वीकारून त्यानंतर पालखी सोहळा जुने शहर मार्गे प्रभात किड्स वाशिम बायपास येथे प्रा. गजानन नारे यांच्याकडे सायंकाळचा किर्तन महाप्रसाद व निवास व्यवस्था करण्यात आली होती.
या पालखी सोहळ्यामध्ये अकोला शहरातील भक्त जणांनी सहभागी होऊन दर्शन व श्रवणाचा लाभ मोठ्या प्रमाणात घेतला. शहर पालखी सोहळा स्वागत समितीच्या वतीने आयोजन नियोजन करण्यात आले होते.
श्री क्षेत्र पंढरपूर पायदळ वारी २५ दिवसांमध्ये ६५० किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून श्री संत वासुदेव महाराज धर्मशाळे मध्ये पंढरपूर येथे पोचणार आहे.श्रीच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सुनियोजित आहे. श्री संत वासुदेव महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव कार्यक्रम संपन्न होणार आहे.
पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांचा काढला विमा !
वारकऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विमा कवच राहाते म्हणून सहभागी झालेल्या सर्व वारकऱ्यांचा श्री संता वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेद्वारा विनामूल्य विमा काढण्यात आला आहे.यानंतर सहभागी पुरुष व महिला वारकऱ्यांना संस्थेद्वारा वारकरी गणवेशाचे वितरण करण्यात आले. सोबत आवश्यक असलेल्या वस्तूचे वाटप करण्यात आले
श्रींची महाआरती होऊन रथयात्रेने भावपूर्ण वातावरणात श्रीच्या पालखी सोहळ्याचे प्रभात स्कूल मधून पंढरपूर कडे प्रस्थान करण्यात आले. अशी माहिती वारकरी समाजसेवक गजानन हरणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....