वाशिम : जिल्ह्यात दि.१७ ते १९ सप्टेंबर २०२४ पर्यंत श्री गणेश विसर्जन करण्यात येणार आहे. विसर्जन कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद राहतील असे आदेश जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी निर्गमित केले आहेत. मंगळवार दि.१७ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन अनंत चतुर्दशीला संपूर्ण जिल्ह्यात पूर्ण दिवस बंद, बुधवारी दि.१८ सप्टेंबर रोजी मालेगाव, मंगरूळपीर, मानोरा पोलिस स्टेशन हद्दीत पूर्ण दिवस बंद, गुरूवार १९ सप्टेंबर रोजी कामरगाव, शेलूबाजार,अनसिंग पोलिस स्टेशन हद्दीत पूर्ण दिवस मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद राहतील.
महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ मधील कलम ५४ व ५६ अन्वये कायदा सुवव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाची अनुज्ञप्ती तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात येईल,असेही आदेशात स्पष्ट केले आहे.