वाशिम : सर्व शासकीय, निमशासकीय व खाजगी आस्थापनांना दर तीन महिन्यांनी ऑनलाईन ई-आर-१
सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे अधिसुचित करण्याची सक्ती करणारा) कायदा १९५९ व नियमावली १९६० कलम
५ (१) व कलम ५ (२) नुसार सादर करणे कायद्याने बंधन कारक आहे. त्यासाठी आपणास यापूर्वी प्राप्त झालेला
युझर आयडी व पासवर्ड टाकुन दिनांक १ एप्रिल २०२४ ते ३१ जून २०२४ या तिमाही कालावधीचे ई-आर-१
जूलै-२०२४ अखेर पर्यंत ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे.
वापर करुन Employer Login मधुन आपल्या आस्थापनेची माहिती (Profile) त्वरीत अद्यावत करावी व
तिमाही विवरण ई-आर-१ ऑनलाईन ३१ जुलै २०२४ पुर्वी सादर करणे आवश्यक आहे याची नोंद घ्यावी.
याबाबत काही अडचण असल्यास या कार्यालयाचा दूरध्वनी क्र. ०७२५२-२३१४९४ या क्रमांकावर संपर्क साधावा.
सहायक आयुक्त
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व
उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिम यांनी कळविले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....