कारंजा : सततधार पावसामुळे कारंजा तालुक्यात पूरस्थिती निर्माण झालेली असून,नदी नाले ओसंडून वहात आहेत.अडाण धरणामध्ये पाणी पातळी वाढतच असून,सतर्कतेच्या दृष्टिकोनातून,अडाण धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले असून,त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.यामध्ये काही गावांचा इतर गावांशी संपर्क तुटू शकतो.त्या अनुषगांने कारंजाचे कर्तव्यतत्पर तहसिलदार कुणाल झाल्टे स्वतः जातीने आपल्या महसूल क्षेत्रातील परिस्थितिचा आढावा घेत असून,नागरिकांनी पावसामध्ये पुराच्या पाण्यात जावू नये.शेतातील कामे सायंकाळ पूर्वी उरकून,लवकर घरी परतावे. शेतात असतांना विजेपासून संरक्षण करण्याकरीता सुरक्षित ठिकाणी जावे.तसेच महत्वाचे म्हणजे विजपासून बचावा करीता प्ले स्टोर वरून दामिनी ॲप डाऊनलोड करून घ्यावे.असे आवाहन तहसिलदार कुणाल झाल्टे यांनी केले आहे. असे वृत्त महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी कळवीले आहे.