बाजारातून खरेदी-विक्री केलेल्या जनावरांची वाहतूक करतांना शासनाने काही नियमावली निर्गमित केलेली आहे. त्यानुसार जनावरे वाहतूक करणारे वाहन आर.टी.ओ. ऑफिस मधून मान्यताप्राप्त पशु वाहतूक परवाना धारक असावेत, पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेल्या जनावरांचीचं वाहतूक करण्यात यावी तर पोलिसांनी वाहतूक तपासणी नाका लावून अवैध पशु वाहतुकीला आळा घालावा, जनावरे वाहनात नेतांना त्यांच्या जीविताला धोका होणार नाही यासाठी काही शासकीय नियम आहेत मात्र ब्रम्हपुरी शहरातून होणाऱ्या पशु वाहतुकीवर कुठलेच निर्बंध दिसून येत नाहीत. शहरापासून वीस-बावीस किलोमीटर अंतरावर असलेल्या विलम-मसली येथे नागभीड आणि ब्रम्हपुरी येथून आणलेले अवैध तस्करीतील जनावर कायद्याचा कुठलाही धाक न बाळगता सर्रास पने, खुल्लम खुल्ला नागपूर साठी रवाना होतं असल्याने परिसरातील नागरिकांत आश्चर्य व्यक्त होतं आहे.
कित्तेक वर्षांपासून ब्रम्हपुरी शहरातील बाजार समिती च्या प्रांगणात दर रविवारला जनावरांचा बाजार भरतो आणि बाजार समिती व्यवस्थापन त्यावर काही शुल्क घेतं असते. तर या बैल बाजारात मोठ्या प्रमाणात जनावर तस्कर दलाल व कत्तलखाना धारकांचा सर्रास सुळसुळाट दिसून येतोयं मात्र यावर कुणाचाही अंकुश नाही. पशु वाहतूक होतं असतांना स्थानिक पोलिस प्रशासनाकडून कुठलीही चौकशी व तपासणी होतं नसल्याने तालुक्यात अवैध जनावर वाहतूक मोठ्या प्रमाणात फोफावलेली दिसून येत आहे तर दर सप्ताहात भरणाऱ्या बाजारच्या "हप्ता" वसुलीच्या शंकेचा नागरिकांत पेव फुटला आहे.