राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामीत्वाचा वारसा अव्याहत वाहता ठेवणे आज अगत्याचे झाले आहे. त्यांच्या स्मृतिशताब्दी वर्षात तरी आपण मृत पुरूषांच्या पत्नीच्या कपाळावर कायम कोरला जाणारा विधवा हा कलंक पुसून काढला पाहिजे. अशा महिलांना समाजात सन्मानाने वागविले पाहिजे. तिच्याकडे एक अपशकुनी स्त्री म्हणून कोणीही हीनकस, तिरकस कटाक्षाने बघणार नाही, तिची कोणी तरी ऐरागैरा माणूस चेष्टा-कुचेष्टा वा निंदा-नालस्ती करता कामा नये. तिला ताठ मानेने प्रत्येक मंगल कार्यात पूर्वीसारखेच वावरण्यास वाव देणे, मी हे त्या कुटुंबातील कर्त्या व समजदार पुरूषाचे परम कर्तव्य समजतो. कपाळावर मळवट, कुंकू, हळदी, टिकली लावणे, हातापायत दागिने घालणे, शृंगारून टापटीप राहणे हे काही अवलक्षण किंवा पाप नाही. घरातील देवपूजा, कूळदैवत पूजन, मंगलकलश धरणे, भगवद्भक्ती, ग्रंथपारायणे करणे, आदींसाठी तिची नाहक अडवणूक करणाराविरूद्ध शासनाने कायदा पारीत करावा. विधवा कुप्रथेला हद्दपार करण्यासाठी शासनस्तरावर सुरू असलेल्या हालचालींचे आपण सुहास्य वदनाने स्वागत करतो. कारण-