कारंजा (लाड) : कारंजा येथील ज्येष्ठ काँग्रेस नेते खेर्डा काळी ग्रामपंचायतचे माजी सरपंच प्रदिपराव विनायकराव वानखडे यांचे लहान बंधू स्व. प्रशांत विनायकराव वानखडे यांचे अचानक अल्पशा आजाराने दि . 04 नोहेंबर 2023 रोजी दुःखद निधन झाले असून, त्यांचे माघारी परिवारामध्ये पत्नी अलका प्रशांत वानखडे, दोन मुली कु. आदिती व कु.चिऊताई , वयोवृद्ध आई आणि भाऊ इ परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाने वानखडे परिवाराची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. त्यांची अंत्ययात्रा उद्या दिनांक.05 नोहेंबर 2023 रविवार रोजी सकाळी 09-00 वाजता त्यांचे हल्ली मुक्कामाचे राहते घर नवीन आयुडीपी कॉलनी वाशिम येथून मोक्षधाम वाशिम करीता निघेल. त्यांच्या आकस्मिक जाण्याने कारंजा व वाशिम शहरात हळहळ व्यक्त होत असून त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच प्रदिप वानखडे यांचे निकटवर्ती शिक्षक आमदार अँड किरणराव सरनाईक,माजी प्राचार्य डॉ के बी देशमुख, पत्रकार संजयकडोळे,उमेश अनासाने, नितीन भट, गोविंदराव मुंदेकर, गीरी गुरुजी, टोपरे गुरुजी आदींनी दु :खात सहभागी असल्याचे कळवून श्रद्धांजली व्यक्त केली आहे.