सततची नापीकी; उत्पादीत मालाचे पडलेले भाव; वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकऱ्यांचे
आर्थिक गणित बिघडलेले आहे . शेतीसाठी घेतलेले पीक कर्ज भरणे कठीन झाले आहे .विधान सभा निवडणूकीत लोक सभेची पुनरावृती होऊ नये म्हणून सत्ताधारी पक्षाने निवडणूकीत जाहीरनाम्यात अनेक प्रलोभने दिलीत . त्यात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी देणे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे नमूद होते . निवडणूक प्रचार सभांमधे शेतकऱ्याला १ रुपयात पीक विमा तसेच कर्ज माफी देऊन शेतक-र्यांचा सातबारा कोरा करु असे आश्वासन दिल्या गेले होते त्यामुळे विश्वास करून शेतकऱ्यांनी फडणवीस सरकार सत्तेत आनले . मात्र शेतकऱ्यांच्या कर्ज माफीचा शासनास विसर पडला असल्याचे दिसत असल्याने शेतकरी एल्गार समीतीने कर्ज माफीचा आवाज बुलुंद केला यात शेतकरी नेते किसान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते प्रकाश पोहरे यांनी शासनास कर्ज माफी देण्यास भाग पाडू वेळ पडल्यास कोर्टात जनहीत याचीका दाखल करु असे रणशिंग फुंकले . त्यासाठी रयतेचे राजे छत्रपती संभाजी महाराज यांचे जयंती दिनी येत्या १४ मे रोजी तहसील कार्यालयात कर्जमाफीचे अर्ज सादर करण्याचे निश्चीत झाले आहे . कर्जमाफीचे अर्ज देशोन्नती कार्यालय तालूका प्रतीनिधी; किसान ब्रीगेड अध्यक्ष यांचे कडून प्रती अर्ज १०रू. प्रमाणे मिळतील . २५ अर्जाचे एक पुस्तक असून प्रत्येकाला तीन प्रतीत अर्ज दाखल करावे लागणार आहे . याबाबत अधीक माहीती देतांना काजळेश्वर शाखा किसान ब्रिगेड अध्यक्ष नितीन पाटील उपाध्ये म्हणाले की पहीली पांढरी प्रत सरकारी कार्यालयात जमा करावी ; दुसरी पीवळी प्रत शेतक-र्यांनी स्वता जवळ ठेवावी; तीसरी निळ्या रंगाची प्रत जबाबदार व्यक्ती मार्फत किसान ब्रिगेडचे जिल्हा कार्यालयात किवा नजीकच्या देशोन्नती कार्यालयात जमा करावी . अर्ज दाखल करतांना तीन्हीही अर्जावर आवक क्रमांकासह सही शिक्का प्रत मिळाल्याची स्वाक्षरी घ्यावी. शेतकरी कर्ज माफी साठी जनहीत याचीके शिवाय पर्याय नाही . कोर्टात जनहीत याचीका दाखल केल्या शिवाय पर्याय दिसत नसल्याने जे कर्ज माफीची मागणी करतील त्यांनाच कर्ज माफी मिळेल असे प्रथम दर्शनी दिसत असल्याने कर्जमाफीचे अर्ज देण्यासाठी तहसील कार्यालयावर १४ मे रोजी यावे . ज्या शेतकऱ्यांनी३१ मार्च पूर्वी स्वताचे पीक कर्ज उधार उसनवार करून भरले आहे अश्या शेतकऱ्यांनी कर्ज भरणा वापसीचे अर्ज सादर करावे असे आवाहन किसान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश पोहरे यांचे सूचने नुसार काजळेश्वर शाखा ब्रिगेड अध्यक्ष नितीन पाटील उपाध्ये यांनी केले आहे. असे वृत्त अशोकराव उपाध्ये यांनी कळवीले .