वाशिम : शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार वाशिम जिल्ह्यामध्ये ३ सप्टेंबर पासून पात्र व्यक्तींसाठी एडल्ट बीसीजी लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. यामध्ये जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालय मार्फत यापूर्वीच जिल्ह्यामध्ये सर्वेक्षण झाले असून १ लाख ४७ हजार ६०२ लाभार्थी पात्र आहेत. त्या सर्वांचे लसीकरण आपल्या जवळच्या उपकेंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र व शासकीय संस्थांमध्ये ३ सप्टेंबर पासून मोफत राबवले जाणार आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल कावरखे यांनी एकही पात्र लाभार्थी लसीकरणापासून वंचित राहणार नाही याकरिता प्रयत्न करण्याच्या सूचना आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांना दिल्या.मोहिमेकरिता १८ वर्षावरील पात्र लाभार्थ्यांचे निकष :
मागील पाच वर्षात क्षयरोग झालेले रुग्ण (१ जानेवारी २०१९ पासूनचे), १ जानेवारी २०२१ पासून टी.बी. उपचाराखाली असलेल्या,उपचार घेतलेल्या क्षयरुग्णाचे सहवासी, BMI १८ पेक्षा कमी असलेले लाभार्थी. BMI चे सूत्र (वजन)/(उंचीचा वर्ग) मापे :- उंची मीटरमध्ये मोजावी.धुम्रपान करणाऱ्या व्यक्ती,मधुमेह असलेल्या व्यक्ती,६० वर्षावरील सर्व नागरिक या लसीकरणासाठी पात्र असणार आहे.