कारंजा : स्थानिक स्वराज्य संस्थाच्या नाली बांधकाम,सडक दुरुस्ती व पुनर्निमान,विद्युत रोषनाई याला तुम्ही विकास म्हणणार काय ? गेल्या दहा वर्षात एखादे तरी विकासाचे उल्लेखनिय असे ठोस कार्य झाले काय ? असा प्रश्न कारंजेकर विचारीत असून, कारंजेकराच्या दुदैवाने माजी मंत्री स्व बाबासाहेब धाबेकर यांनी ज्याप्रमाणे पंचक्रोशीतील प्रत्येक खेडे विभागात डांबरीकरणाच्या रस्त्याचे नव्याने निर्माण केले होते, बारा किलोमीटर कि.मी. वरून पिंप्री फॉरेस्ट धरणा मधून अडाण प्रकल्पाची पाईपलाईन आणून कारंजा शहराचा पिण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यात यश मिळविले होते. माजी आमदार स्व प्रकाशदादा डहाके यांनी ऋषी तलावाचा गाळ उपसून शेतकऱ्याच्या जमीनीला संजीवनी देणे, पोहा वेस, मंगरूळ वेशीचे पुरातत्व खात्याकडून दुरुस्ती, पर्यटन केन्द्र मंजूरी व निर्माण, वैनगंगा नळगंगा प्रकल्पातून उपकालव्याच्या मागणीला मंजूरी, उपजिल्हाधिकारी कार्यालयाला मंजूरी, कृउसा समितीच्या शेतकच्यांना ताबडतोब हाथोहाथ धान्याचा मोबदला देण्याची पद्धती अमलात आणणे.याला म्हणतात विकास कामे ! परंतु आज मात्र गेल्या दहा वर्षा पासून कोणतीही ठोस अशी विकासाची कामेच शहरात झालेली नाही. आज नगर पालिकेला विकास निधी येतो किंवा नाही ?आणि समजा आलाच तर नगर पालिकेचा विकास निधी जातो तरी कोठे ? काहीच कुणाला कळत नाही. खड्ड्याचे शहर, करकचर्याचे शहर,म्हणून हल्ली हे शहर कुप्रसिध्द होतांना दिसत आहे. नगर पालिकेची "प्रधानमंत्री आवास" बारगळलेली आहे. याकडे लक्ष्य देण्यास सत्ताधार्यांना अजिबात वेळच नाही. गोरगरीब मतदार नागरीक "घरकुला" पासून वंचित आहे. जुन्या नगर पालीका दवाखान्याचे जागेवर परत नगर पालिकेचा दवाखाना उभा राहू शकला नाही. नगर पालिकेलाच उत्पन्न देणारे शॉपिंग सेंटर किंवा बाजारपेठ उभी राहू शकली नाही. न प महात्मा फुले मार्केट शिकस्त होऊन गेली आहे तर गांधी चौक भाजी बाजाराची शॉपीग सेंटर कुलूपबंदच पडली आहेत. विकासाचे ठोस काम असलेली महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाची कित्येक वर्षापूर्वी टाकण्यात आलेली नविन पाईप लाईनच सुरु झाली नाही त्यामुळे भर पावसाळ्यात स्थानिक नागरीकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे मात्र इकडे कुणाचे लक्ष्यच नाही. अशा तक्रारी कारंजेकर नागरीक महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामीण पत्रकार परिषदेकडे करीत असल्याचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी कळविले आहे .